पिताना "चिअर्स" का म्हणतात?
पिताना म्हणजे दारूच असे नव्हे तर कोल्ड्रिंक पिताना देखील "चिअर्स" म्हटले जाते. पण का म्हटले जाते हे कोणालाच माहित नसते.जसे फोनवर बोलताना "हॅलो" म्हणतात.आता "हॅलोच" का म्हणतात हे माहिती सेवा ने मागे सांगितले आहेच.आज आपण पिताना चिअर्स का म्हणतात हे पाहु. पिताना चिअर्स म्हटलेच पाहिजे असा काही नियम नाही तरीही छोट्या पासुन मोठ्या पर्यन्त पिताना चिअर्स म्हणतातच. वरकरणी केवळ पाश्चात्यांच एक अनुकरण किंवा नकळत जडलेली सवय एवढ्यापुरताच हा विषय वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र या कृतीमागे अनेक अशी कारणं दडली आहेत.काही आख्यायिका आहेत.चिअर्स म्हणण्याची प्रथा पूर्णपणे परकीय आहे त्यामुळे अख्यायिका पण परकीयच आहेत.मध्ययुगात अनेक युरोपियन देशांमधील लोकांची ही धारणा होती. हातात दारुचा ग्लास घेऊन, चिअर्स करताना मोठ्या आवाजात हा “चिअर्स” असं ओरडलं जायचं.अनेकांच्या आवाजामुळे होणाऱ्या कर्कश्य आवाजाने भुताखेतांना पळवून लावता येईल हा त्यामागील मुख्य उद्देश होता.चिअर्स करताना अनेकदा आपल्या ग्लासातील थोडी दारु जाणीवपुर्वक जमिनीवर सांडली जायची. याबाबत जर्मन नागरिकांचा असा समज होता की असं केल्याने वाईट शक्ती, भुतं ही आपल्याला सोडून निघून जातील..
या समजुतीपायी पार्टी किंवा शुभकार्यात आवर्जून चिअर्स केलं जायचं.तसेच,जहाजातील खलाशी प्रवास करताना एखाद्या ठिकाणी एकत्र जमायचे. यावेळी दारु हा त्यांच्या भेटीतील मुख्य घटक असायचा. संध्याकाळच्या वेळी दारु पित गप्पांचा फड रंगायचा.त्यांचा एकमेकांवर विश्वास नव्हता.हे सर्व खलाशी मातीच्या भांड्यातून दारु प्यायचे, मात्र पार्टी रंगण्यापुर्वी ते ग्लास एकमेकांवर आदळायचे. या प्रक्रियेत एकमेकांच्या ग्लासातील थोडीतरी दारु समोरील व्यक्तीच्या ग्लासात सांडली जायची. यामुळे दुस-या गटातील खलाशाने आपल्या दारुत काही मिसळले तर नाही ना? याची खात्री पटायची. तर अशी चिअर्स म्हणण्याची प्रथा इंग्रजीबरोबर भारतात आली.व आपणही ड्रिंक पिताना(दारू असो वा कोल्ड्रिंक) नकळत "चिअर्स" म्हणु लागलो
Tags
जनरल नॉलेज
