आरोपीचा चेहरा का झाकतात ?
-
🍄दि. १९ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3s3rVRk
☬ आरोपीला घेऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा कपडा घालून झाकलं जातं. कधी त्यांच्या चेहऱ्यावर तसा एक कपडा घातला जातो. किंवा अनेकदा लाच घेताना अटक झालेली व्यक्ती तोंडावर आपला रूमाल घेते किंवा स्वतःचा चेहरा झाकतो. पण यामागे नेमकं खरं कारण काय? हे जाणून घेणं खास गरजेचं आहे.एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक झाली आणि त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना आपण पाहतो की त्याने चेहऱ्यावर रुमाल ठेवलेला असतो किंवा त्याने चेहऱ्यासमोर अशी एखादी गोष्टी धरलेली असते ज्याने त्याचा चेहरा दिसत नाही. मुख्य म्हणजे तो असं करत असताना त्याच्या आजूबाजूचे पोलीस देखील त्याला काही बोलत नाही.तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असे विचार येत असतील की हा तर गुन्हेगार आहे त्याचा खरा चेहरा तर लोकांना कळायला हवा? फक्त नाव नाही तर त्याची ओळख देखील उघड व्हायला हवी, जेणेकरून त्याला चांगली अद्द्ल घडेल.
पण तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की चेहरा न दाखवण्याची ही कृती कायदेशीररीत्या अगदी बरोबर आहे.
समजा 'अ' ला 'ब' वर झालेल्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे . आणि 'क' या गुन्ह्याचा तक्रारदार (साक्षीदार) आहे. तर न्यायालय हे 'क' ला तेव्हाच विश्वसनीय साक्षीदार म्हणून ग्राह्य धरेल जेव्हा 'अ' चा चेहरा सार्वजनिकरित्या प्रदर्शित (मिडिया मार्फत) केला जाणार नाही. जर नॅशनल टेलिव्हिजनवर 'अ' चा चेहरा दाखवला आणि सर्वच देशाने तो पाहिला तर मग साक्ष घेण्याची गरज उरणार नाही. तसेच 'क' च्या साक्षीवर देखील अश्या वेळेस शंका उपस्थित होते, कारण आरोपीचा चेहरा उघड झाल्याने 'क' ला त्याची साक्ष बदलण्यात भाग पाडले जाऊ शकते अश्यावेळी 'क' ची साक्ष किती खरी असे हे सांगता येत नाही. तसेच आरोपीचा वकील देखील याचा फायदा घेऊन साक्षीदाराला खोटे पडण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजेच आरोप सिद्ध होई पर्यंत गुन्ह्याच्या साक्षीवर कोणताही परिणाम होऊ नये तसेच निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आरोपीची ओळख लपवली जाते. ज्याप्रमाणे पुराव्यांसोबत छेडछाड केली जाऊ नये म्हणून ते सुरक्षित ठेवले जातात त्याप्रमाणे आरोपीच्या ओळखीचा निकालावर परिणाम होऊ नये म्हणून त्याची ओळख लपवणे गरजेचे आहे असे Indian Evidence Act सांगतो. परंतु त्याबद्दलची कोणतीही मार्गदर्शक तत्वे मात्र आखून देण्यात आलेली नाहीत.
आरोपीला मिडीयासमोर आणल्यानंतर त्याचे फोटो किंवा व्हिडीयोज काढून पसरवले जाऊ शकतात, हीच गोष्ट टाळण्यासाठी एखादा कपडा किंवा मास्क लावून पोलीस आरोपीला स्वत:चा चेहरा झाकण्यास सांगतात. परंतु एकदा का चौकशीअंती आरोपीने आपला गुन्हा कबूल केला किंवा त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला की मात्र त्याचा चेहरा झाकण्यात येत नाही.आता तुम्ही म्हणत असाल की कधी कधी काही व्यक्तींना उघड्या चेहऱ्यासकट पोलीस घेऊन जातात असं का? तर त्याच उत्तर हे आहे की अश्या व्यक्ती या सराईत गुन्हेगार असतात, त्यांचे फोटो पोलीस स्टेशनमध्ये व मिडीयामध्ये आधीच प्रदर्शित करण्यात आलेले असतात. प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीतही हेच लागू होतं. ज्यांना संपूर्ण देश ओळखतो आहे अश्या व्यक्तींचे चेहरे आरोपी म्हणून लपवून काहीच फायदा होत नसतो.
________________________________
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव ⛱
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. *_爪卂卄丨ㄒ丨_*
Tags
माहिती