या’ महिलांना आंघोळीस बंदी आहे !

⭕ ‘या’ महिलांना आंघोळीस बंदी आहे !
______________________________
❗ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव ❗
______________________________
       _दि. १९ मार्च. २०२१_
•═════• ⭕ •═════• 

फेसबुक लिंक http://bit.ly/30W9sKD           

❏ सकाळी उठल्यानंतर रोजचे विधी आटोपले की होणारी स्वाभाविक गोष्ट म्हणजे आंघोळ करणे, शरिराच्या स्वच्छतेसाठी आंघोळ ही आवश्यक बाब आहे. मात्र आफ्रिका खंडातल्या एका आदिवासी जमातीच्या महिलांना आंघोळ करण्यास बंदी आहे. उत्तर नामिबियाच्या कुनैन क्षेत्रामध्ये राहणाऱ्या हिंबा ट्राईब जमातीमध्ये हीपरंपरा आहे. ज्यानुसार या जमातीमधील स्त्रियांना आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे.


╔══╗
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
❗माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
हिंबा ट्राईब जमातीच्या महिला अफ्रिका खंडातील सर्वांत सुंदर महिला समजल्या जातात. या महिलांना फक्त अंघोळीसाठी मनाई नसून त्यांना हात धुण्यासही पाण्याचा वापर करता येत नाही. पण अशावेळी सुध्दा स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठीत्यांच्याकडे एक उपाय आहे. हा उपाय म्हणजे या सर्वजणी अंघोळीसाठी विशिष्ट अशा औषधी पाण्यात उकळून त्यातूनतयार होणाऱ्या धुराचा वापर करून स्वत:ला स्वच्छ ठेवत असतात. यामुळे अंघोळ न करता ही त्यांच्या शरीराला दुर्गंध येत नाही.तसेच उन्हापासून आपले संरक्षण करण्यासाठी विशिष्ट अशा लोशनचा वापर त्या करतात. हे लोशन प्राण्यांच्या कातड्यांपासून आणि हैमाटाइट रसायनापासून वापरले जाते. या लोशनच्या वापरामुळे किड्यांपासून त्यांचे संरक्षण होते. या लोशनमध्ये हैमाटाइट रसायन असल्यामुळे त्यांच्या शरीराचा रंग लाल पडतो त्यामुळे या महिलांना ‘रेड मॅन’ या नावाने देखील ओळखले जाते.
------------------------------------------
९८९०८७५४९८
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
❗-----------------

                                

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম