'तिथे' जडीबुटीने केला जातो 'सर्पदंशा'वर मोफत उपचार
दि. १९ मार्च. २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3c23tu0
❏ करडी (पालोरा) जि.भंडारा : पालोरा येथील अमरकंठ मेश्राम १५ प्रकारच्या रोगांवर जडीबुटीच्या माध्यमातून धर्मार्थ व नि:शुल्क उपचार करीत असून कोका वन्यजीव अभयारण्यातून भटकंती करुन जडीबुटी मिळवितात. आता पर्यंत शेकडों लोकांना साप, विंचू, कुत्रा, मुळव्याध, किडनीस्टोन, प्रसुतवाई, ठाण (गाठ) वात, लकवा, नपुंसकता, मिया, काटेमिया, खजरी, कानफुटी, चालनीकाटा तसेच अन्य आजारांवर निशुल्क औषधांचे वाटप व लेप लावतात. लाभ होत असल्याने दु:खी होऊन येणारे उपचारानंतर हसत बाहेर पडत असल्याची सुखद अनुभूती रूग्णांना येत आहे.
त्यांच्या पत्नीला दोनदा सर्पदंश झाला होता. खडकी/पालोरा येथील होलबाजी भालाधरे हे साप व विंचूच्या औषधांचे वैद्य म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी उपचार केले. सर्पदंशातून ती सुखरुप बचावली.
होलबाजींनी पालोरा गावात धर्मार्थ औषध देणारे कुणीही नसल्याचे ओळखून विविध औषधांची माहिती व विधी त्यांना सांगितली. प्रत्यक्ष कार्याची माहिती दिली. त्यांच्याबरोबर जंगलात भटकंती करुन औषधांची ओळख व गुणधर्म जाणून घेतल्याचे अमरकंठ सांगतात. ते सन १९९० पासून औषधांचे वितरण करीत असून शेकडो लोकांना त्यांनी विषमुक्त केले.
वनविभाग दखल घेईल काय?
कोका वन्यजीव अभयारण्यातील दुर्मिळ वनौषधींचा उपचार करीत अनेकांना लाभ मिळाला आहे. अमरकंठ अल्पशिक्षित असल्याने त्यांना वनैषधींचे शास्त्रीय नाव माहित नाहीत. मात्र, उपचाराच्या पध्दती त्यांना कळतात. वनविभाग त्यांच्या कार्याची व अनुभवाची दखल घेणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.------------------------------------------
९८९०८७५४९८
माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
❗-----------------
Tags
माहिती