‘इथे’ पाहुण्यांवर थुंकून केले जाते स्वागत!
_________________________
우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우
________________________
तारीख ३१ मार्च २०२१
_______________________
फेसबुक लिंक http://bit.ly/3cxZYMh
नैरोबी : कुठे कशा प्रथा पडतील, हे काही सांगता येत नाही. विशेषतः आदिवासी लोकांमध्ये आपल्याला विचित्र वाटतील, अशा अनेक प्रथा असतात. केनिया आणि टांझानियामध्ये राहणार्या मसाई या आदिवासी लोकांमध्येही अशा अनेक प्रथा आहेत. तिथे घरी येणार्या पाहुण्याचे स्वागत त्याच्यावर थुंकून केले जाते! थुंकले नाही तर पाहुण्यालाही आपला अपमान झाल्यासारखे वाटते.💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
आपल्याकडे तैत्तिरीय उपनिषदात ‘अतिथी देवो भव’ असे म्हटलेले आहे. पाहुण्याचे नीट स्वागत केले नाही तर यजमानाचे सर्व यश, किर्ती, संपत्ती आदींचा क्षय होतो, असे आपल्या संस्कृतीत मानले जाते. त्यामुळे शत्रू जरी अतिथी म्हणून आला तरी किमान गोड बोलून ‘या’ म्हटले जाते आणि कमीत कमी पाणी दिले जाते. एखाद्याकडे पाहून थुंकणे हे आपल्याकडे तिरस्काराचेलक्षण मानले जाते. मसाई आदिवासींमध्ये मात्र या कृतीला सांस्कृतिक महत्त्व आहे. तिथे येणार्या पाहुण्याचा हात धरून त्यावर थुंकले जाते. हे सन्मानाचेप्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे नवजात बाळावर थुंकल्यास त्याचे पाप दूर होतात, असा तिथे समज आहे. लग्नावेळी तीन दिवस वधू व वराने शौचाला जाऊ नये, असाही तिकडे नियम आहे!________________________________
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
✆ 9890875498*
________________________________
Tags
नवल