गावचा विकासनिधी कोठे व कसा खर्च झाला असा पहा

  गावचा विकासनिधी कोठे व कसा खर्च झाला असा पहा  



गावच्या विकासासाठी राज्य सरकार भरघोस निधी उपलब्ध करून देत असते. राज्य सरकार ग्रामीण विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. पण एखाद्या गावचे बजेट कसे ठरते? सरकारकडून गावच्या विकासासाठी किती पटीत निधी मिळतो? रस्ते, गटार, पाणी, वीज, यासाठी गावात निधी कसा खर्च केला जातो? याची माहिती सामान्य नागरिकांना नसते याबाबत आपण जाणून घेणार आहोत.गावाच्या विकासासाठी गावचे बजेट ठरवले जाते. हे बजेट प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ठरवले जाते. यामध्ये ग्रामविकास समितीची बैठक घेतली जाते. यानंतर गावातल्या ज्या काही योजना आहे त्या योजनांची यादी एकत्रित अंदाजपत्रकासह ३१ डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवण्याची आवश्यकता असते. हे अंदाजपत्रक पंचायत समिती राज्य सरकारकडे मंजूरीसाठी पाठवत असते. एका गावाकरिता केंद्र, राज्य सरकार आणि इतर अशा जवळपास ११४० योजना असतात. यामध्ये गावनिहाय या योजनांचा वापर केला जातो. एखादी योजना राज्य सरकारची असेल तर १०० टक्के निधी राज्य सरकार देते आणि केंद्राच्या बहुतांश योजनांसाठी ६० टक्के केंद्र सरकार, तर ४० टक्के राज्य सरकार देत असते.१४ व्या वित्त आयोगा नुसार यापुर्वी ग्रामपंचायतीला प्रति माणसाला प्रत्येक वर्षाला ४८८ रुपये खर्च करण्यासाठी निधी मिळत होता. तर मागच्या वर्षापासून लागू करण्यात आलेल्या १५ व्या वित्त आयोगानुसार प्रतिमाणसी ९५७ रुपये दिले जात आहेत. १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत गावाला मिळालेल्या एकूण निधीपैकी ५० टक्के निधी पाणीपुरवठा, स्वछता आदी बाबींवर तर उर्वरित ५० टक्के इतर बाबींवर खर्च करण्यास सरकारकडून आदेश आहेत. 
पण नेमका निधी या कामासाठी वापरला जातो का? गावच्या विकासासाठी मिळणारा निधीचा योग्य वापर झाला तर गावचा विकास कसा झाला? हा निधी कुठे खर्च केला याची माहिती आपल्याला कशी मिळेल. 
पीएम नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिवसानिमीत्त ई ग्राम स्वराज या मोबाईल मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर आपले राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडून सबमीटवर क्लिक करावे. त्यानंतर ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहायची आहे, ते वर्षं निवडायचे. त्यानंतर तुमच्यासमोर तीन वेगवेगळे पर्याय येतात. यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो ER म्हणजेच elected representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते.
त्यानंतर दुसरा पर्याय Approved activities हा पर्याय ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला ते सांगितलेले असते. त्यानंतर तिसरा जो पर्याय असतो तो म्हणजे Financial Progress यात गावच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते.
या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर त्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम receipt या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम expenditure(खर्च) या पर्यायासमोर दिलेली असते. त्याखाली कामांची list of scheme (योजनेची यादी) हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.
गावचा विकासनिधी कोठे व कसा खर्च झाला असा पहा
काही गावचा निधी शिल्लक राहतो मग या खर्च न केलेल्या निधीचे काय होते? ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम असते असे समजले जाते. 
पैसे खर्च करण्यासाठी सरपंचांकडे डोके असावे लागते. पैसे नेमके कुठे खर्च करायचे? पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो. यासाठी गावच्या विकासासाठी हुशार लोकांना निवडून देणे गरजेचे असते. यामुळे गावचा निधी परत जाऊ न देण्याचे कौशल्य गावातील सरंपचांसह सदस्याची जबाबदारी असते.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম