डास मारण्याच्या रॅकेटचा याने लावला शोध!
फेसबुक लिंक http://bit.ly/3vEUBTg
डास असणाऱ्या जागेत हवेत रॅकेटची बॅट फिरवली की "चटचट" आवाज येतो की समजायचे की डास शॉक लागुन मरत आहेत. सध्या अनेक लोक डास मारण्यासाठी टेनिस रॅकेटसारखी दिसणारी रॅकेट वापरतात. तैवानमधील तैपेई येथील त्साओ आय शिह नावाच्या माणसाने सर्वप्रथम अशी रॅकेट बनवली होती. त्याचे पेटंटही त्याने मिळवले होते. ही रॅकेट त्याने 1996 मध्ये बनवली. त्याच्या नावावर अन्यही काही पेटंट आहेत.त्साओने बनवलेल्या रॅकेटचे आधुनिक रूपडे सध्या आपल्याला पाहायला मिळते.हे रॅकेट दिसायला बॅडमिंटनच्या बॅट सारखे असुन हाताळयला सुटसुटीत असते. या रॅकेटमध्ये दोन जाळ्या असतात. मोठी जाळी आणि त्यामध्ये बारीक जाळी अशी ही रचना असते.
दोन जाळ्यांमुळे डास कितीही लहान असला तरी आरपार जाऊ शकत नाही. जेव्हा डासाचा जाळीशी संपर्क होतो किंवा स्पर्श होतो त्यावेळी विद्युत पुरवठा सुरू असल्याने सर्किट पूर्ण होते आणि डास जळून मरतो. यावेळी छोटा स्पार्क झाल्याचा आवाजही येतो. डास मारण्यासाठी या रॅकेटमधून 500 ते 1500 व्होल्टस्चे व्होल्टेज निर्माण होते. रॅकेटचा माणसांना शॉक बसू नये म्हणून या रॅकेटमध्ये सुधारणा करण्यात आली व त्यात तीन जाळ्या बसवण्यात आल्या. त्साओने 1996 पर्यंत डास किंवा माश्या मारण्यासाठी जी जाळीदार चौकोनी रॅकेट वापरली जाते त्यामध्ये सुधारणा करून तिला विजेवर चालणारी व रिचार्ज करता येणारी रॅकेट बनवली. 1959 मध्ये थॉमस लायने नावाच्या संशोधकानेही माश्या किंवा डास मारण्यासाठी एक उपकरण बनवले होते.पण ते फारसे यशस्वी झाले नव्हते. पण हे आधुनिक रॅकेट सध्या फारच लोकप्रिय असुन घरोघरी पाहायला मिळत आहे.
_______________________________
🥀
Tags
जनरल नॉलेज