या गावातील प्रत्येकजण करोडपती, लाखोपती
दि. १८ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3eRnxkU
गुजरातमधे एक असं शहर आहे जेथील काही लोक करोडपती असून देखील शिपाई आणि सिक्युरिटी गार्डची कामं करत आहेत…!गुजरात मधील साणंद या शहराची ही गोष्ट आहे. टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल मधील सिंगूर येथून आपला प्लांट हलवून तो साणंदमध्ये वसवण्यासाठी गुजरात सरकारकडे अर्ज केला. प्रथम स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला, परंतु गुजरात सरकारने प्रकल्पाचे महत्व पटवून देत जमिनींची योग्य किंमत शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली. त्यामुळे स्थानिकांचा विरोध मावळला आणि त्यांनी जमीन सरकारच्या ताब्यात दिली.
गेल्या सात-आठ वर्षांत गुजरात सरकारने चार हजार हेक्टर भूमी अधिग्रहित केली आहे. याबदल्यात जमिनीच्या मालकांना करोडो रुपये मोबदला म्हणून मिळाले. ज्यामुळे आसपासच्या भागातील लोक एका दिवसात करोडपती झालेत.२००८ मध्ये जेव्हा टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल मधील सिंगूर येथून आपला प्लांट हलवून तो साणंदमध्ये वसवला तेव्हापासून साणंद औद्योगिकदृष्ट्या एक हब म्हणून उदयास येत आहे.
❗येथील रविराज फोईल्स लिमिटेड कंपनीच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या ३०० पैकी १५० कर्मचारी करोडपती आहेत
हे लोक येथे मशीन ऑपरेटर्स, फ्लोअर सुपरवायझर, सिक्युरिटी गार्ड आणि शिपाई सारख्या पदावर कामे करतात. त्यांनी जमीन अधिग्रहणातून मिळालेल्या रकमेला सोने, बँक डीपॉझिट सारख्या गुतंवणूक माध्यमांमध्ये गुंतवले आहे.,टाटा प्लांट येण्यापूर्वी येथे केवळ दोन बँकांच्या ९ शाखा अस्तित्वात होत्या, मात्र येथील लोक करोडपती झाल्यापासून आता येथे २५ बँकांच्या ५६ शाखा असून त्यामध्ये सुमारे तीन हजार करोड रुपये जमा आहेत.
महिन्याला भरपूर व्याज देणारे करोडोंचे bank deposits असताना देखील केवळ “स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी” काम करत रहाणाऱ्या ह्या गुजराती लोकांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
❗पैसा आला म्हणून आळसाने काम करणं सोडू नये, या शिकवणीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे लोक – असं म्हटलं तर वावग ठरू नये!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ϻÃĤĮŤĮ
Tags
नवल