मालवण येथील शिवमुद्रा संग्रहालयात ‘उजेडात चमकणारा दगड’

 मालवण येथील  शिवमुद्रा संग्रहालयात ‘उजेडात चमकणारा दगड’ 

       दि. १८ मार्च. २०१८_
•   

फेसबुक लिंक http://bit.ly/2P55DQQ        

❏ मालवण- मेढा येथील शिवमुद्रा संग्रहालयात रात्रीच्यावेळी प्रकाशमय होणारा दगड सध्या सार्यांचे लक्ष वेधून घेत आहे.यापूर्वी पाण्यावर तरंगणारा दगड याच संग्रहालयात पहावयास मिळाला होता. आता यात आणखी एक भर म्हणजे  रात्रौ बँटरीच्या उजेडात चमकणारा दगड मालवण मेढा येथील उदय रोगे यांच्या शिवमुद्रा संग्रहालयात हा दगड  ठेवण्यात आला आहे.



मालवण येथील  शिवमुद्रा संग्रहालयात ‘उजेडात चमकणारा दगड
याबाबत माहिती देताना उदय रोगे म्हणाले, शिवमुद्रा या संग्रहालयात ऐतिहासिक जुन्या- पुरातन काळातील  वस्तूठेवण्यात आल्या आहेत. या संग्राहालयात रात्रीच्या वेळी  येथील भूमी जोगी ही पाच वर्षीय मुलगी खेळत असताना तिच्या हातातील  बॅटरीचा प्रकाश अचानक संग्रहालयात ठेवलेल्या दगडावर  पडला. यावेळी तो दगड चमकून प्रकाशमय होत  असल्याचे उदय रोगे व हेमांगी रोगे यांच्या लक्षात आले.यावेळी दगडांची पाहणी करण्यता आली. यात एकूण चमकणारेदहा दगड मिळाले  आहेत.
 
विविध रत्नांसाठी जे  क्रिस्टल स्टोन वापरले जातात. त्यामधील हा एक  क्रिस्टल स्टोन असावा,असा अंदाज उदय रोगे यांनी व्यक्त केला.हा सर्वांनाच  अप्रूप वाटण्यासारखं  जरा हटके असा दगड मिळाल्याने शिवमुद्रा संग्राहालयात आणखी एका वैशिष्टपूर्ण वस्तूची वाढ झाली आहे. कणकवली गडनदी व सिंधुदुर्ग किल्ल्यावर राणीची वेळ या ठिकाणी असे दगड आढळतात.नेमके हे दगड कोणत्या प्रकारचे आहेत हे विशेष परीक्षकांना दाखवल्या नंतर समजेल. पाण्यावर तरंगणार्या दगडानंतर हा प्रकाशमय होणारा आगळा वेगळा दगड मिळाल्याने एक वेगळाच आनंद होत आहे. आपल्या सिंधुदुर्गात असे अनेक अद्भुत वस्तू आजही आहेत. पण ते पाहण्यास आपल्याकडे दृष्टी नाही. हीच खंत उदय रोगे यांनी व्यक्त केली.
------------------------------------------
९८९०८७५४९८
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম