आपल्या देशातील प्रसिद्ध गणितज्ञ

आपल्या देशातील प्रसिद्ध गणितज्ञ 


       दि. १७ मार्च. २०१८
•═════• ⭕ •═════•

फेसबुक लिंक http://bit.ly/3cLH2sy
         असे म्हटलं जाते की, "गणित हे विज्ञानाचे साधन आहे'. गणिताशिवाय आपण कोणतेच वैज्ञानिक संशोधन पूर्ण करू शकत नाही. जगाला शुन्याची देणगी देणार्या भारत देशात प्राचीन काळापासूनच गणिताचा अभ्यास होत आला आहे. नुकताच जगभरात ‘वर्ल्ड पाय डे’ साजरा झाला. ‘पाय’ची किंमत हा प्रकार गणित शिकलेल्या प्रत्येकाला माहिती असेलच. त्यावरूनच हा ‘पाय दिवस’ साजरा केला जातो. यानिमित्त भारतातील काही प्रसिद्ध प्राचीन आणि अर्वाचीन गणितज्ज्ञांची माहिती...

आपल्या देशातील प्रसिद्ध गणितज्ञ

🔹प आर्यभट
:इसवी सन 476 ते 550 हा आर्यभटांचा काळ. ते एक महान गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. अवघ्या 23 व्या वर्षीच त्यांनी ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये गणिताची अनेक सूत्रे व सिद्धांत मांडलेले आहेत. त्यांचा ‘आर्यसिद्धांत’ हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.

♦प ब्रह्मगुप्त :
 इसवी सन 598 ते668 हा ब्रह्मगुप्त यांचा काळ.त्यांनी गणित विषयावर ‘ब्रह्मस्फुट सिद्धांत’ हा ग्रंथ लिहिला. गणितीय क्रियांमध्ये शुन्याचा वापर करणारे ते पहिले गणितज्ज्ञ होते, असे मानले जाते. त्यांच्या ग्रंथांमधून अनेक गणितीय सूत्रे व सिद्धांत पाहायला मिळतात, जे आधुनिक काळात अत्यंत महत्त्वाचे ठरले.
🔹प भास्कराचार्य-1 :
 इसवी सनाच्या सातव्या शतकातील भास्कराचार्यांच्या जीवनाविषयी कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, ते एक मराठीगणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते असे काहींचे मत आहे.त्यांनीच शुन्याचा वापर करून भारतीय दशमान पद्धती अधिक रूढ केली, असे मानले जाते. भास्कराचार्य आणि ब्रह्मगुप्त यांनी भारतीय गणितशास्त्राला मोठे योगदान दिले.
♦प भास्कराचार्य-2 : 
बाराव्या शतकातील हे भास्कराचार्य कर्नाटकातील होते, असे म्हटले जाते. त्यांनीच प्रसिद्ध ‘सिद्धांत शिरोमणी’ हा गणित विषयावरील ग्रंथ लिहिला. त्याचा एक भाग म्हणजे ‘लीलावती’. पाश्चात्यांच्या अनेक शोधांपूर्वीच भास्कराचार्यांनी महत्त्वाचे सिद्धांत मांडलेले होते.
 प श्रीनिवास रामानुजन
:रामानुजन यांना गणित विषयाचा मोठाच ध्यास होता व त्यामुळे शालेय जीवनात त्यांचे अन्य विषयांकडे दुर्लक्ष होत असे. त्यांनी गणिताचे 120 सिद्धांतमांडले. त्यांची गणित विषयातील मोलाची कामगिरी पाहून केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना आमंत्रित केले होते. ‘अॅनालिटिकल थिअरी ऑफ नंबर्स’,‘एलिप्टिकल फंक्शन’ आणि ‘इनफायनाईट सिरिज’वर त्यांनी महत्त्वाचे काम केले.
♦प शकुंतला देवी
:या भारतातील आजपर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ज्ञ आहेत. त्यांना ‘मानवकॉम्प्युटर’ही म्हटले जाई. अत्यंत किचकट गणिती क्रियाही त्या कॅल्क्युलेटर शिवाय करून दाखवत. वयाच्या केवळ सहाव्या वर्षीच त्यांनी आपल्या गणिताच्या ज्ञानाने लोकांना दीपवून टाकले होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जगातील सर्वात वेगवान संगणकाच्या आधीच अवघ्या 50 सेकंदांमध्ये त्यांनी 201 चे 23 वे मूळ काढून दाखवले होते.
♦प सी.आर. राव ः
 ‘थेअरी ऑफ इस्टिमेशन’साठी राव यांची ख्याती आहे. कर्नाटकात त्यांचा जन्म झाला आणि आंध्र विद्यापीठातून त्यांनी गणितात पदव्युत्तर पदवी संपादन केली. कोलकता विद्यापीठातून त्यांनी स्टॅटिस्टिक्समधील एम.ए. पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यांनी 14 पुस्तके लिहिली असून मोठ्या नियतकालिकांमध्ये त्यांचे 350 रिसर्च पेपर प्रसिेत.
माहिती सेवा ग्रूप  ग्रूप  पेठवडगाव
🔹प सी.एस. शेषरावरी
:शेषाद्री यांनी अल्जेब्रीक जॉमिट्रीमध्ये बरेच योगदान दिले. मद्रास विद्यापीठात त्यांनी गणित विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केली. शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट हे त्यांचे संशोधन कार्य. 2009 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले.
------------------------------------------
९८९०८७५४९८
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম