⭕ या देशांमध्ये काही महिन्यांमध्ये फारच कमी काळाकरिता होते रात्र ⭕
_____________________________
❗ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव ❗
_____________________________
_दि. १६ मार्च. २०१८_
•═════• ⭕ •═════•
फेसबुक लिंक http://bit.ly/30SxYw8
आपल्या जगामध्ये काही ठिकाणी बारा तास नैसर्गिक प्रकाश आणि बारा तास अंधार असे दिवस आणि रात्र आढळतात. तर काही देश असे ही आहेत, जिथे रात्र ही केवळ नावापुरतीच असते, आणि बाकी वेळ स्वछ ऊन पडलेले असते. या देशांमध्ये वर्षातील काही दिवस हा अनुभव घेण्याची संधी मिळते.
╔══╗
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
❗माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
भौगीलिक स्थिती नुसार नॉर्वे हादेश आर्क्टिक सर्कल मध्ये येतो. या देशाला ‘ मिडनाइट कंट्री ‘ म्हणूनही ओळखले जाते. या देशामध्ये मे ते जुलै या दोन महिनांच्या काळामध्ये सुमारे ७६ दिवस सूर्यास्त जवळ जवळ होतच नाही. स्वीडन या देशामध्ये देखील रात्र फारच कमी वेळपर्यंतराहते. स्वीडन हा देश नॉर्वे या देशापेक्षा थंड असून इथे सुमारेशंभर दिवस संपूर्ण नैसर्गिक प्रकाश राहतो. आणि सूर्यास्त होतो तो मध्यरात्री आणि सकाळी साडेचारच्या सुमाराला उजाडते देखील. त्यामुळे इथे रात्र केवळ दोन ते तीन तासांपुरतीच राहते.आईसलंड हा देश ग्रेट ब्रिटनच्यापाठोपाठ युरोपमधील दुसरे मोठे द्वीप आहे. जगामध्ये इतरत्र अंधारलेले असताना, या देशामध्ये मात्र तुम्ही रात्रीच्या वेळी देखील नैसर्गिक प्रकाशाचा आनंद घेऊ शकता. या देशामध्ये मे महिनाते जुलै महिन्यापर्यंत अंधार पडत नाही. कॅनडा हा देशातील दुसरा असा देश आहे, जो वर्षातील काही महिने बर्फाने झाकलेला असतो. या देशामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुमारे पन्नास दिवस अंधार पडत नाही.अनेक सुंदर तलाव आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेली अनेक द्वीपे असणारा देश म्हणजे फिनलंड. ह्या देशामधील भटकंती, पर्यटकांसाठी अतिशय अप्रतिम अनुभव आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या देशामध्ये सुमारे ७३ दिवस सूर्यप्रकाश अनुभवता येतो. अलास्का मध्ये मे महिना ते जुलैच्या दरम्यान सूर्यास्त होत नाही. अलास्का तिथे असलेल्या अनेक सुंदर हिमनद्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे वर्षातील दोन महिने याबर्फाच्छादित हिमनद्या सूर्याच्या प्रकाशामध्ये चमकताना दिसतात.🔹 वैज्ञानिक कारण- असे का होते?
अंतराळात सूर्य स्थार आहे आणि पृथ्वी आपल्या कक्षेवर 365 दिवसांत सुर्याची एक कक्षा पूर्ण करते. तसेच, ती २४ तासांत अक्षावर एक फेरी पूर्ण करते. पृथ्वीच्या सूर्याच्या या प्रदक्षिणामुळे दिवस आणि रात्र होते. तेथे दिवस आणि रात्रीचा कालावधी नेहमीच सारखा नसतो. कधी दिवस मोठा असतो तर कधी रात्रा लहान असते, कधी दिवस लहान असतो तर रात्री मोठी असते. वास्तविक हे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकण्यामुळे होते. पृथ्वीचा कोणताच अक्ष असत नाही. पृथ्वी फिरत असताना एक उत्तर आणि दुसरा दक्षिणमध्ये बिंदू तयार होतात. या दोन्ही बिंदुंना सरळ रेषेत जोडले तर एक अक्ष तयार होतो. पृथ्वी आपल्या कक्षेतून 66 अंशांच्या कोनात फिरते. त्यामुळे तिचा अक्ष सरळ असत नाही तर तो २३ अंशाच्या कोनाच झुकलेला असतो. या अक्षाच्या झुकण्यामुळेच दिवस आणि रात्र लहान-मोठे होतात. २१ जून आणि २२ डिसेंबर या दोन दिवशी सुर्याची किरणे पृथ्वीच्या अक्षात झुकलेली असतात त्यामुळे पृथ्वी समान भागात पसरत नाही. साहजिकच दिवस आणि रात्रीच्या वेळांमध्ये फरक आहे.
-___________________________
Tags
जनरल नॉलेज