🔹 गो सेवेसाठी स्वत:ला वाहून घेणाऱे बीडचे पद्मश्री सय्यद शबीर 🔹
दि. १६ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3qLkJYQ
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार हा सर्वात मागास तालुका म्हणून ओळखला जातो. शिरूरपासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिवंडी शेतातील वस्तीवर राहणारे सय्यद शब्बीर हे गेल्या २० वर्षांपासून गोशाळा चालवतात. आपल्या दावनीला असणारी जनावरे सकाळी सोडून डोंगरात जगवायची हा दिनक्रम असणाऱ्या शब्बीर मामू यांनी त्यासाठी कसलेही अनुदान कुणाकडे कधीच मगितले नाही. जी मदत मिळेल त्यावर समाधान मानत मुक्या जनावरांची शेण झाडलोट ते २० वर्षांपासून करीत आले आहेत. आपल्या कामाचे कसलीही मार्केटिंग न करता काम प्रामाणिकपणे करणारे शब्बीर मामू यांनी आज दुष्काळी स्थितीत ८५ गाई संभाळल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच कुटुंब या गोसेवत कार्यरत आहे.गेली पन्नास वर्षे निस्वार्थपणे गोसेवा करणाऱ्या बीड मधील सय्यद शब्बीर (65) यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान करण्यात आला.(सन २०१९) नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.
लोकांना वाऱ्यावर सोडलेल्या किंवा कत्तल खान्यात पाठवलेल्या गाई शब्बीर हे त्यांच्या गोशाळेत घेऊन येतात व त्यांचा सांभाळ करतात. गायीच्या पोटात दोन घास गेले की, आपले पोट भरते, गाय सांभाळणे हे पुण्याचे काम असते, गाय सांभाळली की, देवाचे आशीर्वाद मिळतात याच श्रद्धेपोटी सय्यद शब्बीर यांनी सरकारचे कोणतेही अनुदान न घेता किंवा मदतीची याचना न करता आपला हा गोपालनाचा ‘यज्ञ’ सुरू ठेवला आहे.
सय्यद यांनी एक उपाय सुचवतात. ते सांगतात, "जर गायींच्या पालनासाठी जागेची व्यवस्था केली आणि शेणाच्या खरेदीसाठी काही व्यवस्था केली तर लोक आपल्या गायींना सोडून देणार नाहीत. कारण त्यामुळे गायीचं फक्त दूधच नाही तर शेणंही विकलं जाऊ शकतं, याची लोकांना खात्री पटेल. आणि त्यातून आलेल्या पैशातून गायींच्या चाऱ्यापाण्याची व्यवस्था होऊ शकेल."
________________________________
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव ⛱
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _爪卂卄丨ㄒ丨
Tags
व्यक्ति