‼ सनसनाटी विमा केस !! ‼️
विमा पॉलिसी घेताना नियम नाही वाचले तर असे होऊ शकते
फेसबुक लिंक http://bit.ly/3tlSiCs
☬ ही केस लढली गेली नॅशनल इन्श्युरन्स कंपनी विरुद्ध मौसुमी भट्टाचारजी यांच्यामध्ये. झालं असं की, कोलकातामध्ये राहणाऱ्या मौसुमी भट्टाचारजी यांचे पती देबाशीष भट्टाचारजी यांनी बँक ऑफ बडोदाकडून घर बांधणीसाठी कर्ज घेतले होते. या कर्जासोबत बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांना एक इन्श्युरन्स पॉलिसी देण्यात आली होती. या पॉलिसीत पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला विम्याची संपूर्ण रक्कम मिळेल असे नमूद केले होते. ही पॉलिसी सुरू असतानाच दुर्दैवाने देबाशीष यांचे 22/01/2012 रोजी निधन झाले. ते मोजांबिक देशात एका चहा कारखान्यात कामाला होते आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला मलेरियाचा डास!मंडळी, हा पूर्ण काळ ही संपूर्ण केस एकाच मुद्द्याभोवती फिरत होती, तो म्हणजे 'डास चावून मलेरिया होऊन झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यू ठरतो का?' न्यायालयासमोर दोन्ही बाजूंनी अनेक दावे केले गेले, बऱ्याच इतर केसेसचे दाखले दिले गेले. मग एकदा कधीतरी न्यायालयाने ‘अपघात’ या शब्दाचा मान्यताप्राप्त शब्दकोशातील अर्थ बघितला. तर तिथे या शब्दाची व्याख्या ‘अपघात म्हणजे अचानक घडलेली आणि पूर्वनियोजित नसलेली घटना’ अशी होती.
आता या केसमध्ये डास चावणे ही अचानक घडलेली घटनाच आहे असे न्यायाधीशांनी मान्य केले. अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. त्या केसेसचा आधार घेत न्यायाधीशांनी निकाल दिला. २००६ मध्ये अशीच एक केस लढली गेली होती. ती केस होती मातबर सिंग विरुद्ध ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनी यांच्यामध्ये. त्या केसांच्या निकालात कुत्रा चावणे किंवा साप चावणे या अपघाती घटनाच आहेत अस निर्णय दिला होता. याच केसचा आधार घेऊन डास चावणे हा सुद्धा एक अपघातच आहे असा निर्णय घेतला गेला आणि नॅशनल इन्श्युरन्स कंपनीची याचिका परत एकदा फेटाळून मौसुमी भट्टाचारजी यांच्या बाजूने निकाल दिला गेला. सर्वसामान्य लोकांसाठी हा एक महत्वाचा निर्णय आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मंडळी, आपण विमा घेतो पण बरेचदा त्याच्या अति आणि नियमच नीट वाचत नाहीत. ओळखीचा एजंट असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवला जातो आणि कधी कधी तो त्याचं टारगेट पूर्ण करण्यासाठी आपल्या गळ्यात पॉलीसी मारतो. काही झालं तरी आपल्याला विमा कंपन्यांविरुद्ध लढल्या गेलेल्या केसेस आणि त्यांच्या निकालां संबंधी माहितीच नसते.कित्येकदा इन्श्युरन्स कंपन्या छोट्या छोट्या कारणांवरून दावे रद्दबातल ठरवतात आणि ग्राहकांना पॉलिसीचा लाभ मिळू शकत नाही. आजकाल इतके रोग आणि त्यांच्या साठी पसरल्या आहेत, त्यामुळं हा निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी किती महत्त्वाचा आहे पाहा मंडळी.. फक्त आपण ग्राहकांनी यासाठी शेवटपर्यंत लढा द्यायला हवा, मग योग्य तो न्याय मिळतोच.
=========================
🥀
Tags
माहिती