मणेराजुरी- योगेवाडी गावातील कलांवतीनिचे कोडे
📍. जो मनुष्य हे कोडे पूर्ण करील त्याचे भाग्य उजळेल तो धनवान बनेल आणि हे कोडे अर्धवट सोडवून जो त्याच्या बाहेर येईल त्याच्या मागे अनेक पीडा लागतील.
दि. ३० मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3w9PGtr
काही काही गोष्टी अनाकलनीय असतात.मग त्या दंतकथा असो वा कथा असोत.अशा गोष्टी भोवती मग गुढ वाढतच जाते.अशीच एक गुढकथा योगेवाडी येथे पाहावयास मिळते.सांगली पासून साधारणत: 30 किलो मिटर अंतरावर असनार तासगाव तालुक्यातील योगेवाडी हे छोटस गाव. हे गाव मणेराजूरी या गावा शेजारी आहे. या गावाची खास बात म्हणजे येथे असनारा 'कोड्याचा माळ'. येथे दगडांची मांडणी करुन एक कोडं तयार केल गेल आहे. ह्या कोड्या मुळेच ह्या माळा चे नाव 'कोड्याचा माळ' असे पडले आहे. हे कोडं आज पर्यांत कोणाला सुटल नाही. या कोड्यात माणूस गेला की आतच फिरतच बसतो.
असही म्हणल जात की, ती दगडं बाजूला काडून ठेवली तर ती परत दुसर्या दिवशी तेथेच येवून बसतात. जो कोण हे कोडे सोडवेल त्याच नशीब फळफळेल. पण एकदा त्या कोड्यात गेला की ते पुर्ण करुनच बाहेर यावे लागते. आर्ध्यातूनच मागे आल्यास त्याच्या मागे पिडा लागते.
आमवस्येच्या रात्री तर लोक तेथून जावयास घाबरतात. यासगळ्या भाकड कथा जुण्या लोकांनी कदाचीत त्याच्या मनोरंजनासाठी केल्या असतील. पण त्या लोकांच डोक किती सुपीक होत याच हे ज्वलंत उदाहरण आहे. मी स्वत: त्या स्थळाला भेट देवून ते कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला पण आत गेल्या वर आतच फिरत राहते बाहेर येत नाही. फार मजेशीर आणि कुतुहलात्मक स्थळ आहे. एकदा तरी अवश्य भेट द्या.
____________________________
wꀡ▲㈦ㄅ▲℗℗ 9890875498* ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________
Tags
नवल