वेदनारहित इंजेक्शनाचा शोध
दि. ३० मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3rBFg2p
अनेकजणांना इंजेक्शन घेताना भीती वाटते. यालाच ट्रायपॅनोफोबिआ म्हणतात. भारतातील जवळपास 10 टक्के नागरिकांना इंजेक्शन्सची भीती वाटते. डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेण्याच्या विचारानेही नागरिक घाबरतात. परिणामी अशा लोकांना आजार व संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पण भीती वाटणार्या इंजेक्शनच्या सुईसाठी ‘कूलसेन्स’ येथील संशोधकांच्या टीमने उपाय शोधून काढला आहे.💉हे जेल अॅप्लिकेटरच्या त्वचेवर पसरवल्यानंतर त्वचेला थंडावा मिळतो. ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. या उत्पादनाबाबत बोलताना कूलसेन्सचे व्यवस्थापकीय भागीदार शैलेश कुलकर्णी म्हणाले की, रेफरन्स लॅब्स, हॉस्पिटल्स, रिटेल फार्मासीज, डॉक्टरांचे दवाखाने, आरोग्याची तपासणी, आण्विक नैदानिक चाचणी, अॅथलीटचे परीक्षण व वैद्यकीय चाचण्या अशा विविध माध्यमांमध्ये अशा प्रकाराच्या तंत्रज्ञानाची गरज आहे. अशा माध्यमांसाठी ई-कूलसेन्स प्रभावी ठरु शकते. डायलिसिस रुग्ण, केमोथेरेपी व्यवस्थापन, चेहर्यावरील बोटोक्स इंजेक्शन्साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्माटोलॉजी,ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना, पॅथोलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो, असे इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेसियोलॉजिस्ट्स (आयएसए)च्या खासगी चिकीत्सक फोरमचे राष्ट्रीय सह-संयोजक डॉ. पंकज गुप्ता यांनी सांगितले. मूळ इस्त्रायली उत्पादन असलेल्या कूलसेन्स किंमत भारतीय बाजारात सर्वसामान्यांसाठी माफत दरात उपलब्ध आहे.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
Tags
आरोग्य