कोल्हापूरी भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण शब्द

 कोल्हापूरी भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण शब्द  



फेसबुक लिंक http://bit.ly/3rgdqZjhttp://bit.ly/3rgdqZj
जगात कोठेही कोल्हापूरी माणुस गेला नि बोलु लागला तर तो लगेच आोळखु येतो तो त्याच्या भाषेवरून.(भले तो परदेशात इंग्लिश,रशियन,जपानी बोलुदे,पण बोलण्याचा टोन थोडा तरी कोल्हापूरी असतोच)कोल्हापूर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी विभागलेल्या आणि दुसऱ्या बाजूला कन्नड आणि कोकणी प्रदेशाच्या सीमांनी वेढलेल्या या भाषेला वेगळे रंगरूप प्राप्त झाले. व्याकरण व्यवस्था, शब्दसंग्रह अनेक भेदांमुळे ती स्वतंत्र वेगळी ठरत नाही. मात्र, इथल्या भौगोलिक व सामाजिक ठेवणीमुळे तिला वेगळे अस्तित्व मिळाले. दीर्घकाळ संस्थांनी राजवट आणि निसर्गपोषणावर भरलेल्या संपन्न प्रदेशाने या लोकजीवनाला वेगळे रंग प्राप्त करून दिले आहे.

कोल्हापूरी भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण शब्द,Characteristic words of Kolhapuri language

कोल्हापूरच्या भाषेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्त्रियांची भाषा.व्याकरण व्यवस्थेत लिंग वचनाबद्दलचा मोठा फरक स्त्रियांच्या भाषेत आहे. ‘येतो’, ‘जातो’, ‘करतो’, ‘आलो’ अशा पुरुषवाचक क्रियापदांत मुली व स्त्रिया बोलतात. एकाचवेळी भरड, रांगडी पुरुषवाचक बोलीरूपाच्या पुनरावृत्तीने त्यास सामाजिक, सांस्कृतिक वेगळेपण प्राप्त झाले. उच्चारणाच्या वेगळ्या धाटणीमुळे त्यास एक भावपरिणामकारकता प्राप्त झाली. मात्र, या ध्वनी उच्चारात माधुर्यभावाचे प्रसारण करणाऱ्या शब्दांची विपुल उपस्थिती असते. ‘काय मर्दिनी’ असा उच्चार केवळ या परिसरातच स्त्रियांच्या तोंडी ऐकायला मिळतो. तसेच ‘बलिवलंय’ (बोलावले आहे) अशी लोभस असते.सकृतदर्शनी स्त्रियांची उच्चाररूपे भरड, थेट वाटावीत अशी असतात. मात्र, या उच्चारणपरिणामात आत्मीय गोडवा असतो. ‘कवा आलासा’, ‘येतायसा’, ‘जातायसा’, ‘गेलासा’ अशा अकारान्त प्रत्ययाचा स्वाभाविक गोडवा या भाषेत टिकून आहे.,चंदगड, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहूवाडी या प्रदेशातील लोकभाषेच्या व्याकरण, शब्दसंग्रह आणि सुरावटीत कमालीची विविधता दिसते. या भाषेत प्रेमवजा आज्ञाही असते. ‘यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय’, ‘यंदा द्यायचा दणका काढून’ अशी रूपेही दिसतात. नामाच्या विशिष्टतादर्शक सुलभ उच्चारणातून प्रेमभावाचे प्रसारण करण्याची लकब भाषेत आहे. उदा. ‘दसुदा’, ‘वसुदा’, ‘शामादा’, ‘अण्णादा’ ‘दा’ उत्तरप्रत्यय लावून शब्दांचे सुलभीकृत पॅटर्न्स तयार करणे हा एक या समूहबोलीचा विशेष आहे,तरवा’, ‘बेजमी’, ‘हुरदं’, ‘झोमडं’ असे शब्द त्यामुळेच आढळतात.कोल्हापुरी बोलण्यावर प्रचलित भाषिकांना अनेक धक्के बसतात. ‘शिस्तात’ हा शब्दवापरही याच प्रकारचा.(शिस्तात म्हणजे गडबड न करता हळुहळू) ‘आगा कुठं चाललाय गा’, ‘तंबाखू धर गा जरा’, ‘जाशील बस की’, ‘आगा बस गा’ अशी दीर्घ उच्चाररूपे या भाषेत आहेत. या साऱ्या भाषिक लकबांकडे पाहिले की, येथील सामूहिक जाणिवेत निवांतपणा, अघळपणाला विशेष महत्त्व असल्याचे ध्यानात येते.(ध्यानात म्हणजे लक्षात येणे).अनेक शब्द कोल्हापुरी भाषेत आहेत, की त्यात गोडवा, रग, आपुलकी, कुतूहल आणि खूप मोठा बरा-वाईट अर्थही दडला आहे.
‘मातीला जाऊन आलोहे हमखास प्रत्येक कोल्हापूर वासीयाच्या तोंडातील वाक्‍य.मातीला जाऊन येणे म्हणजे एखाद्याच्या अंत्यसंस्कारा साठी जाणे.वास्तविक, हा दुःखाचा आणि भावनिक प्रसंग.पण,एखाद्याला मातीत घातल्या सारखा त्याचा सहज बोलता-बोलता उल्लेख होतो.
 एखाद्याला तुम्ही झोपला होता काय? असे विचारले तर नाही लवंडलो होतो, असे उत्तर मिळते.शोधा म्हणजे सापडेल या तीन शब्दांना ‘हुडका’ असे एका शब्दात मिटविले जाते. वेगात आलो असे सांगण्या ऐवजी ‘तर्राट’ आलो, असे सांगितले जाते. कर्तृत्ववानाला ‘खवन्या’ या शब्दाने गौरविले जाते. चिडलेल्या एखादयाचे वर्णन ‘पिचकलंय’ अशा शब्दात केले जाते. केर काढायच्या झाडणीला "साळुता" फक्त कोल्हापूरातच म्हटले जाते.मामाला "मावळा",इवाई म्हंजी लेकीचा/लेकाचा सासरा.

मावळीन म्हंजी आत्या. चंदगड,आजरा,कागलचा भाग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातीलच पण जवळच कर्नाटक हद्द.यामुळे अनेक कन्नड शब्द आता मराठीत रूढ झाले आहेत. नात्यागोत्याचे अनेक शब्द मराठीत कन्नडमधूनच आलेले आहेत. आई, ताई, अण्णा, अप्पा, काका असे शब्द मुळातले कन्नड आहेत, परंतु हे शब्द मराठीने जशास तसे स्वीकारलेले नाहीत. त्यात आपलं वेगळेपण जपलं आहे. कन्नडमध्ये आई म्हणजे आजी, तर मराठीत माता. कन्नडमध्ये ताई म्हणजे माता, तर मराठीत बहीण या अर्थाने आपण तो शब्द घेतला आहे. थोरल्या भावाला कन्नडमध्ये ‘अण्णा’, तर वडिलांना ‘अप्पा’ असे म्हणतात. तर आपल्याकडे घरगुती संबोधनासाठी ‘अण्णा’, ‘अप्पा’ या संबोधनांचा सर्रास वापर होतो. उदा. मोठय़ा भावाला  ‘थोरला अप्पा’ असे म्हणतात. याशिवाय मोठय़ा बहिणीस ‘आऊ’ म्हणतात. काकाला ‘तात्या’ म्हणतात. नणंदेला व्हंजी वा वन्सं, मावशीच्या नवऱ्याला ‘मावशाप्पा’, वहिनीला व्हनाक, तर पोराला प्वॉर असे संबोधले जाते.नंणदेला "दिवानसाब" व दिराला "बाळासाब" ,सासुला "आत्तीसाब" व सासरयाला "मामासाब" म्हणणारी सासुरवाशीण फक्त कोल्हापूर भागातच आढळते.

हावरट माणसाला कोल्हापूरात हागुरडा म्हणतात.तर तिरके डोळे असणाऱ्याला "टर्क ss"किंवा "जोतीबा-पन्हाळा" म्हणणारा माणुस कोल्हापुरीच.
आता हा हटके लग्नपत्रिकेचा नमुना पहा
कोल्हापूरी भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण शब्द

कोल्हापूरी शब्द संपदा तशी भरपुर या शब्दावर एत डिक्शनरी तयार होईल.

वानगीदाखल खालील शब्द पहा.

वगळणे = ढिस करणे.
केरसूणी = साळूता
नॉनव्हेज = खाटखूट
माकड -=वांडर
खोली बांधणे -=खोली काढणे.
भेटला होता - गाठ पडलेला
रेडिमेड कपडा  =उक्ता
शोधणे = हुडकणे
किंम्मत न देणे -= वास न लावणे किंवा न हिंगलणे...
शेवटचा -= ढोक
डबरा= खड्डा.
किर्‍यानिष्ट - circuit,कटकट करणारा.
पुंगी टाईट होणे =टेंशन येणे.
लै भारी.=म्हणजे खुपच छान.
खुळ्या टाळ्क्याचं = अत्यंत वेडपट.
गुळमाट= गोड.
कोरड्यास-= भाजी
भाकर- =भाकरी
शेक- =आमटी
चिपळून-=कोल्हापूर -= डिसेंट्री .
बल = बल्ब
फोलार = अलगद
ऐंशीन = जोरात
घारी = घारगा
उश्शीर!! = म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन बराच वेळ झाला असेल तर..
आमानी = आम्हाला
तुमानी = तुम्हाला
पाक = सगळं
लडतर = लचांड
झाम झाम = जोरात..
बेस्तरवार= गुरूवार
एेतवार = रविवार
असे कितीतरी शब्द खास कोल्हापूरी म्हणुन अोळखले जातात.जुन्या मराठी चित्रपटात हे शब्द हमखास असायचे कारण कोल्हापूरात चित्रपट निर्मिती होत होती.साहित्यामध्ये शंकर पाटील,महादेव मोरे सारख्या ग्रामीण लेखकानी आपल्या कथा कांदबरीत या शब्दांचा भरपूर वापर केला आहे.
कोल्हापूर भागातील कोणत्याही आठवडी बाजारात गेला तर,रस्त्यावरचा विक्रेता मग तो भाजीवाला असो वा फळेवाला मोठमोठ्याने अोरडत असतो.
काक्काय आलंय बघा...काक्काय आलंय बघा.....काक्काय आलंय बघा. घेता का इस्काटु.....घेता का इस्काटु.....घेता का इस्काटु.....
खाऊंदे गरीब....खाऊंदे गरीब....खाऊंदे गरीब.... हे शब्द हमखास कानावर येतील.कोल्हापूरचे जसे अन्य वैभव आहे तसेच हे शब्दवैभव आहे.रविवार या वाराला एेतवार व गुरूवारला "बेस्तरवार" म्हण्याची खास पध्दत कोल्हापुरातच आहे.
कोल्हापुरी भाषेत येणारा शिवराळपणात एक गोडवा वाटतो. रागात भांडणातही त्याच शिव्या दिल्या जातात. "सुक्काळीच्या" "राण्डच्या" ही अस्सल कोल्हापुरी आजही कोल्हापुरात एेकायला मिळते. रस्त्यावरून चालतांना कुणी मैतर भेंटला, की ‘काय राण्डंच्या, हिकडं कुनीकडं निगालंय्‌स? ‘ अशी हाक हमखास ऐकू येते.येथील माती, रांगडेपण, दिलदारपणा, निसर्ग सारं- सारं आगळंवेगळं आणि मनाचा ठाव घेणारं. येथील चवदार गूळ, कोल्हापुरी साज, झणझणीत मिसळ, रुचकर तांबडा-पांढरा रस्सा, जल्लोषी फुटबॉल, खासबागमध्ये घुमणारा शड्डू, कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी समृद्ध चित्रकलेचा जोपासलेला वारसा, शिल्पकलेत अद्‌भुत निर्मिती करणारे हे कोल्हापूर. आदरातिथ्याचा वस्तुपाठ म्हणजे कोल्हापूर; आणि संकटकाळी धावून येणारा उमदा कोल्हापूरकरच आहे.कोल्हापुरात आलेला पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय जसा राहत नाही, तसा तांबडा-पांढरा रस्सा प्यायल्याशिवाय त्याला चैन पडत नाही.कोल्हापूरच्या मातीत कष्टाळूपणा, रगेलपणा, जिद्द, चिकाटी, धाडस, कल्पकता असे गुण आहेत. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांत कोल्हापूर मागे नाही. क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरचा दबदबा आहे. कोल्हापूर मोठे ग्रामीण शहर वाटत असले तरी ती वस्तुस्थिती वेगळी आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत कोल्हापूरचा आकार मोठा नाही; मात्र विकासाच्या प्रक्रियेत ते मागेही नाही.
-अनिल पाटील,पेठवडगाव
9890875498

=============================


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম