ठाणे-आजोबा पर्वत: श्री रामांच्या मुलांचे जन्मस्थान
दि. २६ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3lR3EvA
ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरापासून 48 किलोमीटर वरती आजोबा पर्वत आहे. ह्या पर्वतावर श्री रामाच्या काळामध्ये सीता माता या पर्वतावर आल्या होत्या. ह्याच पर्वताच्या उंच खडकाळ कोरलेल्या भागामध्ये लव आणि कुश यांचा जन्म झाला होता. असे पवित्र ठिकाण ठाणे जिल्ह्याच्या एक टोकाला असून ह्या पर्वतावर रामनवमी तसेच सुट्टीच्या दिवशी पर्यटक, भक्तगण राज्यातून, देशातून येत आहेत.गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी " रामायण " हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना " आजोबा " म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड पडले. अशी कथा सांगितली जाते. येथे गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.
वाल्मिकी ऋषींना लव आणि कुश आजोबा म्हणतअसत, त्यामुळे या पर्वताला आजोबा पर्वत असे नाव पडले आहे. या आश्रमात वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. इतिहास कालीन वीरगळआहेत, ऋषी ज्या ठिकाणी तपश्चर्या करायचे त्या ठिकाणी शंकराची पिंड देखील आहे. आजही त्या ठिकाणी लव आणि कुश यांच्या पाऊलखुणा भक्तगनाना पहावयास मिळतात.
त्यामुळे भक्तगण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येऊन आश्रमाची सेवा करत आहेत. सह्याद्री डोंगर रांगांच्या सरळ रेषेत हा आजोबा पर्वत आहे. त्याच्या एका बाजूला रतनगड, अलंग मदन कुलंग, कोकणकडा, सांदनदरी तसेच राज्यातील उंच कळसुबाई शिखर देखील या आजोबा पर्वतावरून पहावयास मिळते. तसेच पर्वताच्या दक्षिणेला मालशेज घाटाचा परिसर दिसतो.ठाणे जिल्ह्यातील शहापूर वरून डोलखांब तिथून आजोबा पर्वत असे प्रवास करावा लागतो.या पर्वतावर जाण्याकरिता वाहनाने गेले तर पर्वताच्या पायथ्याशीच वाहने उभी करून ठेवावी लागते आहे. वाल्मिकी ऋषींच्या समाधी स्थळापर्यंत रस्ता माती आणि दगडांचा असल्यामुळे ह्या रस्त्यांवरून वाहने घेऊन जाणे कठीण होते. पायथ्यापासून पर्वतावरील लव, कुश यांच्या जन्मस्थानपर्यंत जाण्याकरिता सुमारे दोन तास वेळ लागतो. एका दिवसांमध्ये आजोबा पर्वतावर जाता येत असल्यामुळे संध्याकाळ पर्यंतघरी परतता येत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक आणि भक्तगणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
Tags
गडकिल्ले