आश्चर्य! १६०० वर्षांनंतरही ‘हा’ लोखंडी स्तंभ गंजरहित आहे. !

आश्चर्य!  १६०० वर्षांनंतरही ‘हा’ लोखंडी स्तंभ गंजरहित आहे. !  


दि. २६ मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3tWcFX2
    नवी दिल्ली : दिल्लीत कुतुबमिनारजवळील लोखंडाचा स्तंभ गेल्या 1600 वर्षांपासून ऊन, वारा आणि पाऊस झेलत उभा आहे. मात्र, अजूनही या लोखंडी खांबाला गंज चढलेला नाही हे विशेष. हा स्तंभ 98 टक्के लोखंडापासूनच बनलेला असूनही त्याला गंज न चढणे ही प्राचीन भारतीय कलेची करामत आहे!

आश्चर्य!  १६०० वर्षांनंतरही ‘हा’ लोखंडी स्तंभ गंजरहित आहे.


आपले पिता चंद्रगुप्‍त विक्रमादित्य यांच्या स्मरणार्थ कुमारगुप्‍त याने या स्तंभाची उभारणी केली होती. इसवी सन 413 मध्ये म्हणजे 1604 वर्षांपूर्वी या स्तंभाची उभारणी झाली. त्याची उंची 7.21 मीटर आहे आणि तो जमिनीत 3 फूट 8 इंच खोल रोवलेला आहे. त्याचे वजन 6 हजार किलोपेक्षाही अधिक आहे.  1998 मध्ये या स्तंभाचे रहस्य शोधण्यासाठी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक डॉ. आर. सुब्रह्मण्यम यांनी काही प्रयोग केले. त्यांना असे दिसून आले की हा स्तंभ बनवत असताना कच्च्या लोखंडात (पिग आयर्न) फॉस्फरस मिसळण्यात आला होता. त्यामुळे त्याला आजपर्यंत गंज चढलेला नाही. यावरून असे दिसते की प्राचीन भारतीय कारागिर, संशोधकांना फॉस्फरससारख्या रसायनांचीही माहिती होती, तसेच त्यांचा यथायोग्य वापर करण्याचे ज्ञानही होते. आजही पाश्‍चात्यांचाच उदो उदो करणार्‍या किंवा पाश्‍चात्यांच्याच ओंजळीने पाणी पिणार्‍यांसाठी हा स्तंभ डोळ्यात अंजन घालणाराच आहे!

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম