वजन कमी करण्यासाठी हे 12 सोपे घरगुती उपाय अवश्य करून पाहा

  वजन कमी करण्यासाठी हे 12 सोपे घरगुती उपाय अवश्य करून पाहा 


फेसबुक लिंक http://bit.ly/3aqP5KN
 लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. सध्या भारतमध्ये जवळपास 4 कोटी 10 लाख लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत, ज्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. तुम्हालाही कमी कष्टामध्ये वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही छोटे-छोटे उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल.
- जास्त कार्बोहायेड्रेट असणार्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते.
वजन कमी करण्यासाठी हे 12 सोपे घरगुती उपाय अवश्य करून पाहा
- फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा गहू, सोयाबीन आणि हरभरे मिश्रित पिठाची पोळी फायदेशीर ठरते.
- दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावे. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.  पपई नियमित खा. पपईचे सेवन केल्याने कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होते.
- दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर घालण्यास काहीच हरकत नाही.
- कारल्याची अर्धवट कच्ची भाजी वजन कमी करायला मदत करतो Ⓜ- आवळा आणि हळद समान प्रमाणत घेऊन बारीक चूर्ण तयार करा. ताकामध्ये हे चूर्ण टाकून घेतल्यास कंबर बारीक होईल.
- एक चमचा पुदिन्याच्या रसामध्ये २ चमचे मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास वजन कमी होते.
- लाल तिखटातील कॅप्सासिन नावाचा घटक हा वेदनाशामक म्हणूनही फायदेशीर ठरतो. दमा, सर्दी, ताप या आजारात हा पदार्थ पूरक ठरतो. एवढेच नाही, तर वजन कमी करण्यासाठी देखील त्याचा फायदा होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे.Ⓜ
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম