या गावात ‘कुत्रीही कोट्यधीश
आहेत
दि. १० एप्रिल २०२१
अहमदाबाद :जमीन ही एक अशी गोष्ट आहे जिची किंमत कमी न होता वाढतच राहते. अशा वाढत्या किमतींमुळे गुजरातच्या एका गावातील चक्क कुत्रीही कोट्यधीश बनली आहेत! मेहसाणातील पंचोट नावाचे हे गाव. तिथे ‘मढ नी पती कुतरिया ट्रस्ट’ आहे. या ट्रस्टला अनेकांनी थोडी थोडी जमीन दान दिली आहे. सध्या या दान केलेल्या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. हा ट्रस्ट कुत्र्यांची देखभाल करतो आणि त्यामुळे त्यांच्या कुत्र्यांकडे अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमली आहे!

मेहसाणा बायपास रोडचे काम सध्या सुरू असल्याने रस्त्यालगत असलेल्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. काही जमिनींचे भाव सुमारे साडेतीन कोटी रुपये प्रतिगुंठाही झाले आहेत! ट्रस्टकडे सध्या 70 कुत्री आहेत. त्यामुळे तेथील प्रत्येक कुत्रा एक कोटीचा मालक बनला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांनी याबाबतची माहिती दिली. गावातील काही श्रीमंतांनी मुक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी म्हणून काही जमीन ट्रस्टला दान देण्याची पद्धत सुरू केली होती. त्यावेळी जमिनीच्या किमती फारशा नव्हत्या. मात्र, आता हे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या जमिनींची विक्री झाली तर प्रत्येक कुत्र्याच्या वाट्याला किमानएक कोटी रुपये येतील. हा ट्रस्ट कुत्र्यांशिवाय अन्यही काही प्राणी व पक्ष्यांची काळजी घेतो.
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰