होय ! आईसक्रीम मध्ये ड़ालड़ा असतो
फेसबुक लिंक http://bit.ly/3fWS8Oy
आइसक्रीम खा...पण हे वाचा बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. याचआईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टीआहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.____________________________
उन्हाळ्यात तर सगळे आईस्क्रीमवर तुटून पडतातच; पण हल्ली वर्षभर चालणारी कित्येक आईस्क्रीम पार्लर्स शहरात उघडली आहेत. मोठ्या कंपन्यांबरोबरच शहरात छोट्या-छोट्या कारखान्यांतूनही विविध प्रकारचे आणि कित्येक फ्लेवर्सचे आईस्क्रीम बाजारात आलेले दिसते.आपण जे आईस्क्रीम खातो, ते किती चांगले आहे आणि किती विषारी आहे, ते आपल्यालाही समजत नाही. त्यामुळे आईस्क्रीम खाताना जागरूक राहिले पाहिजे.
दुधाच्या मलईपेक्षा वनस्पती तूप स्वस्त आहे आणि मलईपासून बनवलेले आईस्क्रीम्स सर्वसाधारण तापमानात जास्त काळ राहू शकत नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या अनेक भागांत काही बोगस कंपन्यांनी दुधाऐवजी वनस्पती तूप(डालडा) मिसळलेल्या आईस्क्रीमचा पुरवठा केल्याचे गेल्या वर्षी समोर आले होते. खरे आईस्क्रीम आणि वनस्पती तूप मिक्स केलेले आईस्क्रीम यांच्यात फारसा फरक ओळखता येत नसल्याने ग्राहक या आईस्क्रीमला बळी पडतात
थंडगार आईस्क्रीम खाताना आपल्याला त्यातल्या भेसळीची चव चटकन कळणे शक्य नसते. पण वेगवेगळे फ्लेवर्स आणि काही खाद्यपदार्थांचा वापर या बनावट आईस्क्रीममध्ये केला जातो. त्या फ्लेवर्समुळेही मलईमिक्स आहे, की वनस्पती तूपमिक्स हे सहज कळत नाही. चवदार आईस्क्रीम खाण्याच्या नादात आपण डालडा खात आहोत, हे मोठ्यांनाही कळत नाही, तर लहान मुलांना कसे कळणार?
डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात.” आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,“डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.
🔹जास्त दिवस टिकण्यासाठीच भेसळ
दुधाच्या मलईपासून बनवलेले आईस्क्रीम जास्तीत जास्त महिनाभर टिकते. नंतर ते खराब होते.दुधाच्या खऱ्या आईस्क्रीम साठवणुकीसाठी अखंड वीजपुरवठा असावा लागतो, जो आपल्याकडे सततच्या लोडशेडिंगमुळे अशक्य आहे.
खऱ्या आइस्क्रीमची वाहतूक करण्यासाठी वातानुकूलित वाहनाची गरज असते.
वनस्पती तुपापासून बनविण्यात येणाऱ्या बनावट आईस्क्रीमला यापैकी काहीच लागत नाही.
वर्षभर ठेवले तरी ते खराब होण्याचा धोका नसतो.
स्वस्तातला कच्चा माल, कमी वाहतूक खर्च आणि अधिक नफा यामुळेच भेसळ होते.
कशी ओळखणार भेसळ?
आईस्क्रीममध्ये धुण्याची पावडर मिसळलेली असेल तर लिंबाचे काही थेंब त्यात टाकल्यास बुडबुडे येतात. धुण्याची पावडर नसेल तर बुडबुडे येत नाहीत. साखरेऐवजी आईस्क्रीममध्ये सॅकरिन मिसळले असेल, तर चवीवरून ते ओळखता येते. सॅकरिनची गोड चव जिभेवर रेंगाळते; पण काही वेळातच जिभेला कडसर लागते.
________________________________________________________
मागे एकदा रत्नागिरी ला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तोमाणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणिनवनवीन फ्लेवर्स बनवतो आणिआईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय डी सी मधे प्लांट सुरु करायचा होता .त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करा म्हणून तो मला व सराना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.
त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेकनवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काहीकंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. तेआवडणाऱ्यात मीही एक होतोच.
तो म्हणाला ; “आता मी ग्वाहा(पेरू) आणि चॉकलेटआईस्क्रीम मध्ये ४ -४नवीन फ्लेवर्स बनवलेआहेत. जे मला आता कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांनाखूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदाउठवता येईल. ”
प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आम्हाला उपलब्ध मार्केट त्याची सध्याची परिस्थिति प्रोडक्टचा वाव त्याला उपलब्ध असणारा पर्याय ,लागणारा पैसा, लागणार वेळ ब्रेक ईवन पॉइंट वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात म्हणून मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेटउघडलं आणि तुझे फ्लेवर लोकांना आवडले नाही तर तू त्या चॉकलेट किंवा पेरू फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडे पर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वायाजाणार नाही का ? मग ते नुकसान कुणी सोसायच?”. पुढे माझेअनेक प्रश्न होतेच. वीजखर्च, दुध , कच्चा माल वाहतूक इत्यादी.
त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ;“त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही.अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही...”
आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ;“ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”
तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासूनआईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत. ”
“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”
“डालडा तुपापासून!”
“काय डालडा तूऽऽऽऽप?” होय डालडा-वनस्पति तूप दचकलात ना
पण काय आहे सर
“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्यातर सगळे डालडाच वापरतात आणित्यामुळेच ते परवडतं. आजकाल आईस्क्रीममध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की ते डालडातूप आहे. शिवाय ते दुधाच्याआईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं.त्यामघे जो दुधाच्या आइसक्रीम मधे बर्फाचा कचकचित पणा काही वेळा येतो तो येत नाही आणि तेच लोकांना आवडतं.दूसर म्हणजे डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”
तो भरात येऊन त्याच्या तंत्राचमार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.
पुढे तो सांगत होता; “डालडाआईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही.हे आपण घरात बघतच असतो याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला काही दिवसांनी वास येतो. आणि १०-१२ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळेखर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम वर्ष भर जरी फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.
डालडा आईस्क्रीमसाठी लाईटखुपच कमी लागते. १० डिग्रीतापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते आत्ता आठवत नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्याआईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.
शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चामाल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपेआहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीममध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे.म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात. ”
तर हे असे आहे.
Tags
माहिती