आदमापुरात कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक

 भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्र बनेल, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल; आदमापुरात कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक

दि २७ मार्च २०२५

श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी आज, पहाटे संत बाळूमामा मंदिरासमोर भाकणूककार कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक झाली. यात त्यांनी देशासह राज्याच्या राजकारणावर भाकणूक केली. भाकणूक एैकण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

भाकणुकीचा गोषवारा असा  

भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्र बनेल. हिंदू धर्माची संस्कृती बाहेरील देश आत्मसात करतील, देशात समान नागरी कायदा येणार, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल असे सांगितले.
आदमापूर हे गाव दुसरी काशी आहे, बाळू धनगराचा वाडा बघण्यासाठी जगातून माणसे येतील, माझ्या वाड्याच्या पायऱ्या सोन्याच्या होतील.

नदी जोड प्रकल्प येईल. दुष्काळी भागात नंदनवन होईल, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघेल, देशात नवीन कायदा येणार, मोठी महामारी येईल, उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी जलाशय सगळे आटून जातील, जलप्रलय होईल, जलाशयाला मोठं भगदाडं पडेल, वादळ, भूकंप याने जगाची उलथापालथ होईल, गावातला मनुष्य जंगलात राहील.

शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जयजयकार होईल, हिंदू धर्माची पताका जगात मिरवेल.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম