गुढीपाडवा व संभाजीराजेंचा संबध दाखवुन बोंब मारणारया नतद्रष्टानो हा घ्या पुरावा

गुढीपाडवा व संभाजीराजेंचा संबध दाखवुन बोंब मारणारया नतद्रष्टानो हा घ्या पुरावा

-
  

 छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास  

फेसबुक लिंक http://bit.ly/3wAFQ4n
   सोशल मीडियावर हल्ली अनेक तथाकथित इतिहास संशोधक तयार होत आहेत.या संशोधकाना वडयाचे तेल वांग्यावर लावायची सवय लागली आहे.सध्या सोशल मीडियावरगुढीपाडवा जवळ आला की उठणारी आवई म्हणजे “छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा मनुस्मृतीनुसार झाला, आणि राजांच्या हत्येच्या आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारण्यास सुरुवात केली. त्यामूळे गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण साजरा करू नये” ही !_
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडीया साईट्स आणि अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून पद्धतशीरपणे तरुणांची माथी भडकवण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशातच, ज्यांना सत्य काय माहित नसते अशांना या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात आणि समाजात आणखी तेढ निर्माण होते.वास्तविक खरा इतिहास काय आहे हे कोणी समजुन घेत नाही व युुट्युब वर दाखवलेले व्हिडिओ, व्हॅॉटसअपवरील मेसेज म्हणजे पुरावे वाटु लागतात. 
बऱ्याच कादंबरीकारांनी हा सर्व प्रसंग खुलवून आणि मुळात गुढी पाडवा हा हिंदूंसाठी आणि मराठी माणसांसाठी फार महत्वाचा असल्याने त्या दिवशीच ठरवून महाराजांचा वध केला असं लिहिलं आहे. असा औरंगझेबाचा इरादा असूही शकतो हे आपल्याला औरंगजेबाचा एकूण इतिहास पाहता कळू शकतं. आपल्या सख्या भावाचीही जो धिंड काढून पुढे त्याच्याच बायकोशी 'निकाह' करू शकतो तो तमाम मराठी मनाला दुखावण्यासाठी हि कृती करू शकेल यात नवल नाही. एखाद्याला खिजवून आणि एखाद्याची जिरवण्याचा असा खुनशी स्वभाव औरंगजेबाचा होता हे त्याच्या सर्व इतिहासावरून आपल्याला दिसून येतं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे असा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक पुस्तकात नाही कि मुद्दाम 'गुढी पाडव्याला' हा वध करण्यात आला. काही महाभागांचं असं म्हणणं आहे कि संभाजी महाराजांच्या वधापूर्वी मराठी माणसं 'गुढी पाडवा' हा सणच साजरा करीत नसत संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर 'ब्राह्मणांनी' मुद्दाम तो भाला आणि महाराजांचं शीर याच प्रतीक म्हणून 'गुढी पाडवा' हा सण साजरा करण्यास सुरुवात केली. या असल्या अफवा केवळ समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी असतात हे बऱ्याच निष्पाप लोकांना कळतच नाही. 
छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास



❗पण – गुढीपाडव्याचे उल्लेख शंभूराजांच्या मृत्यूपूर्वीच्या अनेक ऐतिहासिक कागदपत्रात असल्याने असल्या गैरप्रचाराला बळी पडण्यास काही कारण आहे असं वाटत नाही.गुढी पाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात. शिवराय असताना देखील गुढी पाडवा साजरा केला जात होता. इतिहासाचार्य वि.के.राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने, या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले. आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत. 

गुढीपाडव्याचे १६८९ पूर्वीचे उल्लेख आपण पाहूया

🔹पुरावा १) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत ! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा”असा स्पष्ट उल्लेख आहे.
म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

🔹पुरावा २) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा –
शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात.”

म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.
🔹पुरावा ३)  श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात-
ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।
अर्थात “राम आल्यावर गुढ्या” इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवायचा का?
संतांनी देखील गुढी पाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादींमधून केला आहे. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांच्या ओळी आहेत.
ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय ४/६/१४ मधील ओळींत आणि अनेक ठिकाणी ‘विजयाची गुढी’ व असे अनेक गुढी पाडव्याचे उल्लेख, गुढी पाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात. 
🔹पुरावा ४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. या पत्रात नारायण शेणवी.
“निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला” असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.

______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম