विद्युतप्रवाह नसलेल्या वस्तुला स्पर्श केला तरी करंट का लागतो? हे आहे शास्त्रीय कारण
फेसबुक लिंक http://bit.ly/3uBGUTJ
आठवतय का?, आपण लहानपणी एक खेळ खेळायचो ज्यात एकाला प्लास्टिकच्या खुर्चीवर बसवून मागून खुर्चीला टॉवेलने मारायचो. त्यानंतर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला हात लावला की आपल्याला करंट लागायचा. आणि आपण ही काहीतरी जादू आहे असं समजून आश्चर्यचकित व्हायचो. आणि स्वतःला जादुगार समजायचो.तर ह्यामागे वैज्ञानिक कारण आहे. हे झटके किंवा करंट लागण्यामागे विज्ञान आहे.
झटके आपल्याला थंडीच्या दिवसांत जास्त लागतात. ह्याचं कारण म्हणजे वातावरणातील आर्द्रता कमी असणे.ह्या करंटमुळे कधी कधी त्रास देखील होतो. ह्याचं कारण म्हणजे स्पार्क. पण आता हा स्पार्क शरीरात कसा तयार होतो. आपल्याला शाळेत शिकविले गेले आहे की ह्या जगात जे काही बनले आहे त्यांची उत्पत्ती ही अॅटम्स म्हणजेच अणूंपासून झाली आहे. ह्या अणूंमध्ये निगेटिवली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स, पॉजिटिवली चार्ज्ड प्रोटॉन्स आणि न्यूट्रल न्यूट्रॉन्स असतात.
निगेटिवली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स आणि पॉजिटिवली चार्ज्ड प्रोटॉन्स हे नेहेमी समान संख्येत असतात.ज्यामुळे अणू स्टेबल असतो. पण जेव्हा ह्या इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सची संख्या एकसारखी नसते, जेव्हा त्यांच्यातला संतुलन बिघडते तेव्हा अश्या परिस्थितीत इलेक्ट्रॉन्स एक्साइट होतात आणि ते बाउन्स व्हायला लागतात.
❗जेव्हा कुठल्याही व्यक्तीत किंवा वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते, तेव्हा ते निगेटिव चार्जने प्रभारीत होऊन जातात.
निगेटिव्ह- पॉजिटिव्ह एकमेकांकडे आकर्षले जातात. आपल्याला हा सिद्धांत तर माहित आहेच. ह्याचं सिद्धांतानुसार जेव्हा कुठल्या वस्तूत किंवा व्यक्तीत इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते तेव्हा ते इतर वस्तूंमध्ये असलेल्या प्रोटॉन्सकडे आकर्षले जातात. आणि त्यामुळे आपल्याला हा करंट लागतो.
पण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तेव्हाच जास्त करंट तयार करते जेव्हा मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटोन्स यांच्या संख्येत फरक निर्माण होतो.
तुम्हाला हे नक्कीच कळले असेल की कुठल्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श केला की, आपल्याला अचानकपणे करंट का लागतो. आपल्या शरीरात घडणाऱ्या प्रत्येक हलीचालीमागे काही ना काही शास्त्रीय कारण नक्की असते, आपल्याला केवळ ते जाणून घेण्याची, समजून घेण्याची गरज असते.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498 ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
Tags
माहिती
