धनुषकोडी (रामेश्वरम) एक उजाड़ झालेले गाव
फेसबुक लिंक http://bit.ly/3rYe2mF
(तामिळनाडू)रामेश्वरमच्या उत्तरेस 18 किलोमीटरवर असलेले भारताचे टोक. रामेश्वरमवरून धनुषकोडीकडे निघालेली ट्रेन नंबर 653 स्टेशनच्या अगदीजवळ आली होती. बोगीतून दूरवर दिसणारा समुद्र काहीसा विचित्र वागत होता पण रेल्वेतील 110 प्रवासी आणी 5 स्टाफला घरी जायचे वेध लागल्यामुळे काहीच लक्षात आले नाही. घड्याळाचा काटा रात्रीचे 12 वाजत असल्याचे दाखवत होता. अन अचानक समुद्र वर आला. 20 फुटापेक्षा उंच असणाऱ्या भयंकर लाटांनी रेल्वेला खेळणे बनवले अन क्षणात गायब केले. श्रीलंकेस जवळ असणाऱ्या या गावाने त्या एकाच रात्री 1800 लोकांचे मृत्यू पाहिले. तेव्हापासून उजाड झालेल्या या गावकडे भीतीमुळे नंतर कोणीच रहायला गेले नाही. आज धनुषकोडीची एक ओळख भूतांचे गाव म्हणून होते.धनुषकोडी मधील गेल्या काळातील सुंदर जीवन आता खंडरांमध्ये बदललेले दिसते आहे. साल 1964 च्या चक्रीवादळा पुर्वी धनुषकोडी एक तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात होते. 19 डिसेंबरला रात्रीच्या वेळी ह्या गावाने वेगवान चक्रीवादळाचे रूप धारण केले. हे चक्रीवादळ २७० कि.मी
प्रतिघण्टाच्या वेगाने श्रीलंकेला ओलांडून धनुषकोडीच्या तटावर धडकले. चक्रीवादळाच्या 20 फुट उंच लाटांनी
धनुषकोडी नगराच्या पूर्व संगमे कडून नगरावर आक्रमण केले, त्या भयंकर लाटांनी नगरात येणारया रेल्वेला आणि पूर्ण धनुषकोडी नगराला नष्ट करून टाकले तसेच 1800 पेक्षा जास्त लोक यात मरण पावले .
या बेटा वरील पंबन सेतु सुद्धा वाहून गेला.
प्रत्यक्षदर्शी सांगतात समुद्राच्या लाटा रामेश्वरम च्या मुख्य मंदिरा जवळ येउन थांबल्या होत्या जेथे शेकडो लोक स्व:ताचा जिव वाचावा म्हणून शरण आले होते.
या आपदा नंतर मद्रास सरकारने या शहराला भुतांचे शहर म्हणून तसेच रहाण्यास अयोग्य असे घोषित केले गेले . आता फक्त दिवसा काही दुकानदार व्यवसाय करण्यास येथे येउ लागले आहे परंतु सायंकाळी मात्र 7 वाजायच्या अगोदर तेथून परततात. येथे येणारया पर्यटकांना सुध्दा शासनाकडुन वेळोवेळी सूचित करण्यात येते की "पर्यटकांनी एकमेकांन सोबत रहावे तसेच सूर्यास्ताच्या पुर्वी परतावे तसेच परतीचा १५ कि.मी. चा हा रस्ता निर्मनुष्य आणि भयानक आहे".
Tags
माहिती

