तुम्हाला माहीत आहे का?की, फेसबूकच्या बाहेर फेसबूक आपल्याला ट्रॅक करतं ते..?
फेसबुक लिंक http://bit.ly/3eeZgTY
आजकाल प्रत्येक जण फेसबुक वर आहे,कळत नकळत आपली माहिती आपण फेसबुक वर देऊन टाकतो.नंत ते विसरूनही जातो.प्रश्न आहे: फेसबूक आपल्याला ट्रॅक करतं का..?उत्तर आहेः हो, करतं.
नवा प्रश्न आहे: फेसबूक आपल्याला फेसबूकच्या बाहेर ट्रॅक करतं का...? उत्तर आहेः हो, करतं. आपल्याला गूगल ट्रॅक करतं हे पुरेसं माहिती होतं. गूगलवर आपण जे जे शोधतो, ते ते गूगल नोंदवून ठेवतं...वर्षानुवर्षे...अगदी तारीख आणि वेळनुसार.
फेसबूक आपल्याला फेसबूकच्या बाहेर ट्रॅक करतं, हे नवीन आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात फेसबूकचं नवं अपडेट आलंय. त्यामध्ये फेसबूकनं आता गूगलचाच मार्ग पत्करल्याचं दिसतंय. तुम्ही फेसबुक वर काय काय उद्योग करून बसलाय हे पाहायच असेल तर हे करा. व पहा
🔹आपलं ट्रॅकिंग असं पाहू शकता
👉🏽 फेसबूक > सेटिंग्ज > Your Facebook Information👉🏽 Your Facebook Information > Off-Facebook Activity
👉🏽 Off-Facebook Activity वर क्लिक करा
फेसबूक बाहेर आपण केलेल्या 'उद्योगांचं' भांडार खुलं होईल...!!
🔹यातून फेसबूकचा फायदा काय...?
1. आपली आर्थिक, सामाजिक, मानसिक 'गरज' (need) आणि 'इच्छा' (desire) जाणून घेणं.2. आपल्या गरजा आणि इच्छा बाजारपेठेत विकून टाकणं किंवा त्यासाठीची बाजारपेठ उभी करणं.
3. बाजारपेठेने आपल्या गरजा आणि इच्छांचा कल जाणून आपापली उत्पादनं, सेवा आपल्याला विकणं.4. बाजारपेठेवर मोनॉपॉली प्रस्थापित राहणं. स्वाभाविक नफ्यातला सर्वाधिक वाटा स्वतःचा. 5. बाजारपेठेचं प्रेडिक्शन करणं, ती मॅनेज करणं आणि नियंत्रणात ठेवणं.
तरीही फेसबूक वापरणं काही थांबवता येणार नाही!
मग, आपण किमान काय करू शकतो...? पुन्हा त्याच सेटिंग्जमध्ये जाऊन Off-Facebook Activity पर्यंत पोहोचून Clear history ऑप्शन वरचेवर वापरणं, हा सध्यातरी एक पर्याय दिसतोय.
हा ऑप्शन फार वापरला जातोय, असं काही जाणवत नाहीय. किमान भारतात तरी. आपल्या खासगी जगात कोणी अनाहूतपणे डोकावतंय, यां भान तसंही आपल्याला फारसं नसतं...
कोरोना व्हायरसमुळं सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक जग फेसबूकवर आहे. कल्पना करा, या क्षणी फेसबूककडं जगाची आर्थिक, सायकॉलॉजिकल, सोशल किती माहिती जमली असेल...!!
आता हे उदाहरण पहा.
चार महिन्यांपूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये डिजिटल मीडियातली प्रायव्हसी या विषयावर चर्चा सुरू होती. तेव्हा एक एक्स्पर्ट, उद्योजक म्हणालाः भारतीयांना प्रायव्हसीची किंमत नाहीय...रुपया/पाच रुपयांच्या कॉईनसाठी आपण सगळीच्या सगळी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन डिजिटलवर देऊन टाकतो.आता बोला!तर हे असं आहे,तरीही आपण सुधारणार की नाही?
Tags
माहिती
