काळे पडलेल्या केळातही अनेक गुण असतात

काळे पडलेल्या केळातही अनेक गुण असतात  


 दि. २१ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2QJqGt3
    🍌 बारा महिने उपलब्ध असलेल्या केळात अनेक आरोग्यदायी गुण असतात. रोज केळांचे सेवन केले तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. अनेक वेळा केळी काळी पडली की ती सडली असे समजून त्यांना फेकून देण्यात येते. मात्र, अशी केळीही आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

काळे पडलेल्या केळातही अनेक गुण असतात


🍌 संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल फंड फॉर अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंटने अशा काळ्या केळांचे गुण सांगितले आहेत. या केळामध्ये ट्रिप्टोफॅन नावाच्या पोषक घटकाचा स्तर अधिक असतो. स्ट्रेस आणि एन्झायटी (ताणतणाव) कमी करण्यासाठी हा घटक गुणकारी आहे. अशा केळांचा वापर ब्रेड बनवण्यासाठी किंवा मिल्कशेकसाठीही होऊ शकतो कच्चे हिरवे केळ खाल्ल्यास त्यामुळे रक्तातील शर्करेचा स्तर नियमित राहण्यास मदत मिळते. असे केळ अतिशय संथपणे पचते. त्यामुळे रक्तात कमी साखर निर्माण होते. पिकलेले केळ उत्तम अँटिऑक्सिडंट मानले जाते. ते आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेला मजबूत करते. ते सहजपणे पचू शकते आणि नाश्त्यावेळी त्याचा उपयोग करणे हितावह ठरते.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম