स्मगलर,कैदी नवस पुजा करतात ते अनोखे मंदिर

स्मगलर,कैदी लोक नवस करतात ते अनोखे मंदिर


दि. ९ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2RHayZC
एखाद्या देवतेने आपली विशिष्ट इच्छा पूर्ण केल्यास आपण तिला विशिष्ट पदार्थ अर्पण करू किंवा तिच्यासाठी विशिष्ट व्रत करू, असे अभिवचन देणे म्हणजे नवस करणे होय. नवस बोलण्याचा प्रघात प्राचीन काळापासून सर्वत्र चालत आलेला आहे. नवस हे एक काम्य व्रत असले, तरी ते सशर्त आहे. देवाने आधी भक्ताची इच्छा पूर्ण करावयाची व मग भक्ताने नवस फेडायचा, असा क्रम त्यात असतो. म्हणजे नवसामध्ये एक प्रकारे देवाच्या देवत्वाला आवाहनाबरोबरच आव्हान ही असते.इच्छापूर्ती साठी नवस करण्याची प्रथा आपल्या भारतवर्षात फार प्राचीन आहे. मग इच्छा पूर्ण झाली कि देवाला जाऊन नवस फेडायचा. नवस बोलताना जी वस्तू काबुल केली असेल ती देवाला नेऊन वाहायची अशी ही पद्धत. नवस फेडीसाठी कितीतरी विविध प्रकारच्या वस्तू देवाला वहिल्या जातात. मध्य प्रदेशातील जालीनेर गावात एक मंदिर असून येथे देवळात नवस फेड म्हणून हातकड्या किंवा बेड्या वाहण्याची प्रथा आहे. ही प्रथा गेली ५० वर्षे पाळली जात आहे.   

स्मगलर,कैदी लोक नवस करतात ते अनोखे मंदिर
         

मिळालेल्या माहितीनुसार या देवळात जसे सर्वसामान्य लोक दर्शन व पूजेसाठी येतात तसेच कैदी आणि स्मगलर ही येथे पूजा करू शकतात.खाख्खर देव असे नाव असलेले हे मंदिर नागदेवतेला समर्पित आहे. येथे तुरुगातून सुटका व्हावी,जामीन मिळावा म्हणून कैदी, स्मगलर चोरून रात्री येऊन पूजा करतात आणि नवस पूर्ण झाला कि बेड्या आणून देवाला अर्पण करतात असे समजते.या कैदी व दोन नंबर लोंकाचे हे मंदिर श्रध्दास्थान आहे.फरारी लोक येथे येऊन जातात म्हणुन पोलीस या मंदिरात लक्ष ठेवून असतात.

___________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম