किल्ले खानापुर

   किल्ले खानापुर                             

फेसबुक लिंक http://bit.ly/3xLO2iI   

सांगली जिल्ह्यातील खानापूर सर्वाना माहित आहे पण तो किल्ला होता हे पटणार नाही.इतिहासाचा धांडोळा घेतला तर,खानापूर हा किल्ला होता हे समजते.गावात बरयाच जणाना याची माहिती नाही.माहिती सेवा ग्रूप पेठवडगावच्या माध्यमातून आम्ही थोडा शोध घेतला कागदपत्रे तपासली तेव्हा सत्य काही वेगळेच सामोरे आले.खानापुरचा किल्ला भुईकोट प्रकारातील आहे मात्र सुरक्षेच्य दृष्टीने गाव बांधताना ५० फुट ऊंचीचा ड़ोंगर तयार करून त्यावर गाव वसलेले आहे.यांचे नेमके स्थान हे सह्याद्री पर्वतरांगेतील महादेवाला ड़ोंगर यांवर आहे याच महादेवाच्या ड़ोंगररांगेत अगदी शेवटी भुपाळगड़ (बाणुरगड़) किल्ला आहे.सध्या खानापुर हा सांगली जिल्ह्यातील तालुका आहे खानापुर किल्याची बांधनी अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे.खानापुरात यायच असल तर चारही बाजून ड़ोंगर चढून यावं लागत .किल्ल्याची तटबंदि,बुरूज खंदा हे सर्व अगदि खोल अभ्यास करून बांधलेले आहेत गडाची तटबंदि जवळपास 30 ते 40 फुट उंचीची होती यामध्ये खालील 30 फुलाची दगडी तट वरील 5 ते 10 फुटाची तटबंदी मातीची होती .ही माती घाणीत मळलेली व चूना राख यांचे मिश्रण असलेली असल्याने दगड़ासारखी कठिण आहे या तटबंदिमध्ये ९ बुरूजांची रचना केलेली आहे किल्ला बांधताना सर्वप्रथम ही तटबंदि व बुरूज बांधुन घेतलेले आहेत नंतर यामध्ये पांढर माती भरली गेली ही माती भरत असतानाच अनेक पेव, आड़ ,विहित हे तयार केले गेले गावातील पेव जी धान्य पाठविण्यासाठी वापरली जात तेही अगदि पक्क्या बांधकामाची होती.ही माती भरत असतानाच गावाखालून पुर्व पश्चिम भुयार तयार केले गेले ज्याचा दरवाजा आजही गावातील राजवाड़्यात आहे तर अश्याप्रकारे माती भरल्यानंतर त्यावर वळवले गेले पड़लेल्या पावसाचे पाणी किल्यात थांबता कामा नये.यासाठी ही माती भरताना तटाच्या बाजुला उतार केला गेला आजरोजी देखील गावात कोठेही पाणी थांबत नाही.गड बांधताना सखोल अभ्यास करून गड बांधला आहे.या भुईकोट किल्ल्याला एकुण १३ बुरुज आहेत.असे अवशेषावरून लक्षात येते.किल्ल्याच्या पुर्वेला महादरवाजाच्या बाहेर गणेश बुरूज आहे हा आजही चांगल्या स्थीतीत आहे खालील साधारण १० फूट बांधकाम दगडी तर वरील ४० फूट बांधकाम मातीत आहे.महादरवाजावर होणारा हल्ला परतवून लावण्यासाठी व परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा बुरूज बांधला असावा. बुरूजावरील शरभशिल्प फार सुंदर आहे वरील बाजूस कूंभारी विटांनी केलेली सुंदर साखळी लक्ष वेधून घेते असाच पण बर्यापैकी ढासळलेला एक बुरूज पश्चिमेकड़े आहे बाकी बुरूज मात्र नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. या बुरुजामध्ये नेमकं काय वापरलं आहे माहीत नाही ज्यायोगे हे बुरुज १५०० वर्षांपुर्वीचे असुन देखील सुस्थितीत आहेत. आज बांधलेल्या घराची हमी फक्त १०० वर्षांचीच दिली जाते.अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मातीत कोणत्याही प्रकारच्या बिया रुज नाहीत . आज रोजी आपण कितीतरी किल्ल्यांची तटबंदी झाडाझुडुपांमुळे पडलेली बघतो तीही दगडांची. ईथे माती वापरलेली असुन देखील त्यात बिया रुजत नसतील तर आश्चर्यच म्हणावे लागेल.याचे कारण मात्र कळत नाही.

किल्ले खानापुर

राजवाड़ा :-
यालाच गावामध्ये आज रोजी हवेली म्हटले जाते किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी तोंड़ करून राजवाड़ा बांधलेला आहे किल्यावरील सर्वात उंच जागी राजवाड़ा असल्याने संपुर्ण किल्यातील हालचालीवर लक्ष ठेवता येते.याच राजवाड़्यात एक तळघर आहे जे दोनशे माणूस बसशील इतक मोठं आहे किल्ल्यावर राजवाड़ा ही एकमेव ईमारत दोन मजली होती पुर्वी राजवाड़्यावरून प्रत्येक बुरूजावर संपर्क असायचा .याच कारणाने किल्ल्यात कोणत्याही मंदिरात कळस बांधायचा नाही व कोणीही आपल घर दोन मजली बांधायच नाही असा पुर्वी नियम होता याचं कारण म्हणजे बुरूज व राजवाड़ा यामध्ये काहीही येता कामा नये याच राजवाड़्याच्या तळघरातून भुयारात जाण्यासाठी दरवाजा असे.राजवाड़्याकड़े जाणार्या वाटा ह्या मुद्दाम अवघड वळणांच्या व लहाण केलेल्या आहेत जेणेकरून राजवाड़ा नवख्या व्यक्तीला सापड़तच नाही ही सर्व वैशिष्ट्ये या राजवाड़्यात आजही पहावयास मिळतात.
किल्ल्यातील रस्त्याची बांधुणी अगदी वैशिष्ट्यपूर्ण केलेली आहे जे रस्ते मिळून कसेही चौक तयार होत नाही समोरासमोरील दोन रस्ते यामध्ये थोड़ेतरी अंतर आहे यामूळे शत्रु हल्ल्यानंतर आपले लोक कूठे पळून गेले याच अंदाजच लागत नाही. किल्ल्यावर पुर्वी वाड़ा संस्कृती होती जवळपास प्रत्येकाचा वाड़ा होता हे वाड़ेही आगदी खणकर बांधनीचे व नक्षीकाम असणारे होते प्रत्येक वाक्यामध्ये स्वतंत्र आड़ होता .किल्ल्यावर पाण्याची टंचाई कधीही नव्हती व आजही नाही किल्ल्यात धान्य साठवीण्यासाठी ठिकठिकाणी पेव तयार केलेली होती किल्ल्यात सरकार वाड़ा पुर्वी ईमारत होती या इमारतीचा वापर शाही पाहुण्यांच्या निवासा करीता केला जात होता हा वाड़ाही चिरेबंदि होता.किल्ल्याच्या बाहेर दोन चांगल्या स्थीतीतील समाध्या आहेत ज्या आज्ञात व्यक्तीच्या आहेत यापैकि एका समाधीवर छत्र आहे अशा समाध्या शक्यतो राजे लोकांच्या असतात.
खंदक
.संपुर्ण गावाभोवती पुर्वी खंदक होता. किल्ल्याच्या शेजारून पापनाशी ओढा गेलेला आहे या ओढ्याचा वापरदेखील खंदका सारखा केलेला दिसतो. पुर्वी पापनाशी ओढ्याचे पात्र मोठे होते,सध्या अतिक्रमणामुळे ते लहान झालेले दिसते. हा ओढा पुर्व - पश्चिम असल्याने जवळपास अर्ध्या किल्ल्यास पापणाशीच्या रूपाने नैसर्गिक खंदक प्राप्त झालेला आहे ज्या बाजूस खंदक नाही त्या बाजूस मात्र 20-30 फुट रूंद व तितकाच खोल खंदक तयार केला गेला या खंदकात सतत पाणी खेळवलं जात. या मानवनिर्मीत खंदकाचे आजदेखील अवशेष सापडतात.आज सर्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
किल्याचा इतिहास
माहिती सेवा ग्रूपने आधिक माहिती घेतली असता असे समजले की,किल्ला नेमका कोणी .केव्हा बांधला याबाबत पुरावा उपलब्ध नाही. पण खानापुर चा किल्ला पाचव्या शतकात अस्तित्वात होता याचा एक पुरावा सापडतो किल्ल्यात पाचव्या शतकातील ताम्रपट सापडला ज्यामध्ये रेठरे बुद्रुक.कुंतल या ठिकाणाच्या दिलेल्या दानांचा उल्लेख आहे .हा ताम्रपट राजा माधववर्मन पहिला यांचा आहे त्यामुळे खानापुर किल्ला १५००  वर्षांपूर्वी अस्तित्वात होता असे समजते.त्यानंतर 10 व्या ते 11 व्या शतकातील बसवेश्वरांच्या चिरित्रात किल्ल्याविषयी पुरावा सापड़तो १६३१ मध्ये असदखान नामक सरदाराच्या नेतृत्वाखाली विजापुरविरूद्ध मोहीम निघाली पण काही कारणानी असदखानाला माघार घ्यावी लागली त्यानंतर लगेचच निजामशाही सरदार सिध्दि रिहान मुहम्मद अदिलशाहाला जाऊन मिळाला.आदिलशाहाने त्याला खानापुर,कराड़ व कोल्हापूर जहाॅगीर म्हणून दिले १६७८ मध्ये दिलेरखानाने संभाजी छत्रपतींबरोबर भुपाळगड़ाची मोहीम मांडली या दरम्यान खानापुरात संभाजी महाराज राहीले होते.असे इतिहास सांगतो.फलटणच्या मुधोजी नाईक निंबाळकरांचा नातु अमृतराव नाईक निंबाळकर याला फलटण परगण्यातील या (खानापुराची व सावर्ड़े या गावची)देशमुखी होती. संताजीं घोरपडेंचा खुन करणार्या नागोजी मोनेचा अमृतराव हा मेहुणा होता.१६९२मध्ये राजाराम महाराजांनी फलटणचे वतन याला दिले अमृतराव हा शुगर,पराक्रमी मतलबी व धुर्त होता ऐवारकुटीच्या लढाईत अमृतराव मारला गेला.असा इतिहास आहे. पण आज खानापूर बद्दल खुद्द गावातील लोकानाच अनास्था असल्याचे दिसते.जवळच विटा हे गाव असुन या गावाशी सतत खानापूरचा संबंध असतो.खानापुर बद्दल अजुनही माहिती मिळेल पण याबद्दल म्हणावे तितके इतिहास संशोधन होत नाही.









(सध्याच्या वाडयाचे फोटो)
फोटो सौजन्य: अम्रूतराव निंबाळकर विटा
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম