किल्ले कोळदुर्ग

किल्ले कोळदुर्ग


फेसबुक लिंक http://bit.ly/3nIWsCR
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात हा किल्ला आहे.कोळदुर्ग हा किल्ला विटा- जत रस्त्यावर  म्हणजेच विजापूर गुहागर हायवेवर पळशी या गावापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला या परिसरातले लोक मात्र “कुळदुर्ग” म्हणून ओळखतात.गडावर अलीकडे सापडलेल्या एका शिलालेखा मुळे हा किल्ला साधारण ९०० वर्षापासून अस्तित्वात आहे पण शिवकाळात मात्र या किल्ल्याचे कोणतेच उल्लेख आढळत नाहीत. कोळदुर्गाजवळ असलेले निसर्गरम्य शुकाचारी मंदीर या भागात प्रसिध्द आहे.      

किल्ले कोळदुर्ग
   पळशी गावाच्या मागची टेकडी चढल्यानंतर गाडी रस्त्यालाच पुढे एक उतार लागतो. या उतारावर डाव्या बाजूला एक कच्चा गाडी रस्ता किल्ल्याच्या अगदी जवळ नेतो.                                               
        ⚡ किल्ल्याचा इतिहास                                                                                  
    हा किल्ला एका कोळी राजाने बांधला आहे. मात्र त्याचा इतिहास  समजत नाही.दुसऱ्या भोज राज्याच्या विरोधास बंड करण्यासाठी हे एक महत्वाच ठिकाण होत. भूपाळगडा सारखा भक्कम व महत्वाचा किल्लायाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे कोळदुर्ग हा बहुदा भूपालगडाच्या प्रभावळीतला एक संरक्षक व टेहाळीचा किल्ला असावा असे वाटते.मुख्य डोंगराच्या सपाटीवर अंदाजे १०० एकरात पसरलेला हा दुर्ग साधारण त्रिकोणी आकाराचा असुन दोन बाजुला दरी तर उर्वरित बाजुस पठार अशी याची रचना आहे. दरीच्या बाजुने तुरळक तटबंदी तर पठाराच्या दिशेने भक्कम तटबंदी व बुरुज बांधुन किल्ला बंदीस्त केलेला आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोरच एक घर असुन एका बाजुला शेती तर दुसऱ्या बाजुस दूरवर पसरलेल्या दगडांच्या राशी पहायला मिळतात. गडावरील प्राचीन मंदिराचे व इतर वास्तुचे कोरीव दगड आसपासच्या गावकऱ्यांनी त्यांच्या गावात नेऊन तेथील वास्तु बांधण्यास त्याचा वापर केला आहे. किल्ल्यावरुन उत्तरेला भूपाळ गडावरील मंदिर दिसते.किल्ल्यातील चौथऱ्यावर अलीकडेच सापडलेला सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा चालुक्यकालीन कन्नड लिपितील भग्न शिलालेख आहे. हा शिलालेख १७ ओळीचा असून काही अक्षरे पुसट झाली आहेत. या शिलालेखाचा सुरूवातीचा भाग भग्न झाला असुन शिलालेखाच्या उर्वरित भागात मध्यभागी एका आसनस्थ साधूची मूर्ती व बाजूला चंद्रकोर आहे. शिलालेखात सुरूवातीच्या भागात एका जैन मुनींचे वर्णन असुन या वर्णनात ते पर्वतासारखे श्रेष्ठ, कामदेवावर विजय मिळवलेले, कुलीन, विद्वान आणि जगद्वंद्य असल्याचे म्हटले आहे. शिलालेखात काळाचा उल्लेख नसला तरी त्यात चालुक्य राजा जगदेकमल्ल याच्या नावाचा उल्लेख आहे. हा राजा इ.स. ११३८ ते ११५० दरम्यान राज्य करीत होता. यावरून हा किल्ला ८०० वर्ष जुना असावा.किल्यावरील सर्व वास्तु आता भग्न झाल्या असुन सर्वत्र अवशेष दिसतात.मात्र जे काही थोडे अवशेष म्हणजे तटबंदी व बुरुज पाहण्यासाठी एखाद्या स्थानिकाची मदत नक्कीच घ्यावी. गाडी लावून थोड अंतर चढल्यानंतर आपण किल्ल्यातच आहोत हे खर सुद्धा वाटत नाही. तटबंदी बद्दल बोलायचं झाल तर या पुर्ण डोंगरवर स्थानिक लोक शेती करत असल्याने शेतबांधाच्या अनेक साखळ्या अगदी दूर पर्यंत पसरलेल्या आहेत. त्यात दगडांची रचीव तटबंदी शोधण म्हणजे एक मोठे दिव्य काम आहे. या किल्ल्यावर पूर्वी एखाद कलाकुसर असलेलं खूप सुंदर मंदिर असाव असं इथल्या अनेक इतस्थता पडलेल्या घडीव दगडांवरून वाटत. मात्र शेतीच्या बांधासाठी येथील कलात्मक दगडांनी व मुर्त्यांनी त्यांची जागा कधीच बदलली आहे. या किल्ल्यावरील अनेक कोरीव काम केलेले दगड पळशी गावातील मंदिरात वापरले आहेत.लोकानी इतिहासाची मोडतोड केलेली दिसुन येते.इतिहासाच्या  या मक साक्षीदाराला एकवेळ अवश्य भेट दयावी.जाताना पाणी अवश्य घेऊन जावे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম