घोरण्याच्या समस्येवर एक जालीम उपाय!
___________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
___________________________
फेसबुक लिंक http://bit.ly/3nOJV0P
आपल्या बाजुला झोपलेला कोणी घोरत असेल तर आपल्या झोपेचे खोबरे झालेच म्हणुन समजा.पण तेच जर आपण घोरत असेल तर ते आपणास पटत नाही.आपण घोरतो हे आपणास दुसरयाने सांगितल्यावर कळते.घोरण्यावरहा व्यायाम करून पाहा. जीभ आणि तोंडाचा हा सोपा व्यायाम या समस्येतून सुटका मिळण्यास मदत करू शकतो. संशोधनात हे आढळलं आहे की, हा व्यायाम घोरण्याच्या सवयीला ३६ टक्के आणि घोरण्याच्या आवाजाला ५९ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकी कॉलेज ऑफ मेडिसिनच्या बारबार फिलीप यांनी सांगितले की, घोरण्याच्या समस्येसंबंधी अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी हे संशोधन उपायकारक आणि विना शस्त्रक्रिया आहे.घोरण्याच्या समस्येनी पीडित लोकांनी जीभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जीभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जीभेच्या पुढच्या भागास दातांना स्पर्श करत जीभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि 'ए' उच्चार करत टाळूला वर उचलावं. घोरण्याची समस्या कमी करण्याच्या संशोधनात हा व्यायाम सुचवण्यात आला आहे. या समस्येनं पीडित ३९ जणांनी हा व्यायाम केला आणि याचा परिणाम सकारात्मक होता.याशिवाय आणखी एक उपाय करून पहा,पाठीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता वाढते. कारण पाठीवर झोपल्याने तुमचा टाळू आणि जीभ गळ्यातील वरच्या भागात येतात. त्यामुळे मोठ्या आवाजात ध्वनी उत्पन्न होतो आणि तोच आवाज घोरण्यात बदलतो. यामुळेच सरळ पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा. कुशीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता कमी होते.
घोरणारे अनेक लोक स्थूल असतात. स्थुलतेमुळे गळ्याजवळ खूप अधिक फॅट्स जमा होतात. त्यामुळे गळ्याजवळील पेशी आकूंचन पावतात आणि हेच घोरण्याचे मोठे कारण ठरते. यापासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार वजन घ्या.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
Tags
आरोग्य