रावणाचे आजोळ बिसरख,येथे रामलिला व रावण दहन होत नाही

रावणाचे आजोळ बिसरख,येथे रामलिला व रावण दहन होत नाही


दि ४ मे २०२१
काही इतिहास संशोधक रावणकथा ही पौराणिक न समजता घडलेला इतिहास मानतात. त्यांच्यामते हा काळ इ.स. पूर्वी २५५४ ते २५१७ ह्या काळातील असावा.
दिल्ली पासुन २५ किमी अंतरावर गौतम बौद्ध नगर जिल्ह्यातील बिसरख गावात रावणाचा जन्म झाला होता,हे गाव म्हणजे रावणाचे आजोळ व रावणाची माता कैकसी हिचे बिसरख माहेर होय.

रावणाचे आजोळ बिसरख

रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले.रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता.रावण प्रचंड विद्वान होता तसेच राजधर्म जाणकार होता.त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई कैकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. रावणाचे एक आजोबा (आईचे वडील) राजा सुमाली यानी त्याला दैत्य संकल्पनेत शिक्षण दिले होते.रावणाला अनेक नावे होती.ती पुढील प्रमाणे रावण,रुद्राक्ष , मेलुहेश,लंकेश,प्रजापती,लंकेश्वर,काल,अहिरावण,मातंग,गिरधारी,गिरलिंग ,मानस,कलिंग,मर्दन,कलांकेश्र्वर इत्यादी.,रावणाला कुबेर, विभीषण, कुंभकर्ण, अहिरावण, खर और दूषण असे सहा भाऊ व दोन बहिणी- शूर्पणखा आणि कुंभिनी होत्या. पैकी शूर्पणखा, कुंभकर्ण आणि रावण हीच फक्त सख्खी भावंडे होती. कुंभिनी ही मथुरेच्या मधुदैत्याची पत्नी झाली. लवणासुर हा त्यांचा पुत्र. कालकेचा मुलगा दानवराज विद्युविव्हा हा शूर्पणखेचा पती होता.रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्यादेखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती.
रावण आयुर्वेद जाणत होता.त्याला राज्यशास्त्राचे ज्ञान होते. हिंदू फल ज्योतिषशास्त्र ह्या विषयांत तो तज्ज्ञ होता.
बिसरख या गावात रावणाचे मंदिर आहे. या मंदिरात ४२ फूट उंच शिवलिंग आहे. तसेच ५.५ फूट उंच रावणाची मूर्ती आहे. या गावातील लोक रावणाला महाब्रह्म म्हणतात. या गावात दसऱ्याची दिवशी रावणाचे दहन केले जात नाही, उलट रावण दहनाचा शोक व्यक्त केला जातो.
रामाने लक्ष्मणाला मृत्यू-शैय्येवर पडलेल्या रावणाजवळ राजधर्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी पाठविले होते. तेव्हा रावण म्हणाला मी आयुष्यात सर्वात मोठी चूक केली आहे. माझ्या तीन योजना होत्या. स्वर्गापर्यंत जाणारी शिडी तयार करणे, समुद्राचे खारे पाणी गोड करणे आणि सोने सुगंधी करणे. या ततिन्ही योजनांबाबत मी कालपर्यंत टाळाटाळ केली आणि सितेच्या अपहरणाचे चुकीचे काम केले. आता नेहमी हे लक्षात ठेवा की, चांगल्या कामात टाळाटाळ करण्याऐवजी ते त्याचक्षणी तात्काळ केले पाहिजे आणि वाईट काम उद्यावर ढकलले पाहिजे
.

बिसरख गावातील फोटो

भारताबाहेर रावणाला विविध नावाने ओळखले जाते ती नावे अशी
कई रावण ...... लंका
बसेरावण ..... इराक
तहिरावण .... इराण
कहिरावण ....मिश्र इजिप्त
दहिरावण ... सौदी अरब
अहिरावण ... अफ्रीका
महिरावण ... क्रोएसिया
इसाहिरावण ... इस्राइल
बहिरावण ... भूमध्य सागर
मेरावण ...... आर्मेनिया
$ तर अशा या रावणाकडे फक्त राक्षस म्हणुन न पाहता त्याच्या गुणाकडेही पाहिले पाहिजे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম