महाराष्ट्रातील प्रति ताजमहाल

महाराष्ट्रातील प्रति ताजमहाल 


.            दि. १८ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3ymt0r1
ताजमहाल कोठे आहे म्हटले की कोणीही सांगेल की तो आग्रा येथे आहे म्हणुन.पण आपल्या महाराष्ट्रात देखील एक ताजमहाल आहे.अगदी सेम टु सेम.असल्यासारखा

महाराष्ट्रातील प्रति ताजमहाल

जुन्नर तालुक्यात नारायणगाव ते जुन्नर हायवेवरआमरापुरकडे जाण्यारया रोडवर एक मोठी वास्तु दिसते तिच "प्रति ताजमहाल".या परिसराला "हापुसबाग" म्हणतात.पण स्थानिक लोक "हबशीबाग" म्हणतात.कारण मलिक अंबर या हबशाने (हबशी म्हणजे निग्रो लोक)ही वास्तू बांधली.निजामशाहाचा वजीर असलेल्या मलिक अंबर हा हापुसबागेत राहावयास होता.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,या बागेत हापुस आंब्याची झाडे असावित.म्हणुन हापुसबाग नाव पडले असावे.मलिक अंबरने ही इमारत बांधताना कोणाच्या आठवणीसाठी बांधली हे समजत नाही.पंरतु ती बांधताना त्याच्या समोर आग्र्याच्या ताजमहाल निश्चित समोर असणार.ऊंचच ऊंच ५५ फुट रुंद व ६० फुट लांब कोरीव शिळेतील चौरसाकृती ही वास्तू साधारण ५० फुट ऊंचीच्या नक्षीदार भिंतीवरील कमानीवर ३० फुट उंच असलेला वरील घुमट अलगद तोलुन धरल्याचे पहावयास मिळते.         
या इमारतीच्या आतील भागात नऊ समाध्या असुन.इमारतीत आपण जोरात आवाज दिलात तर त्या ध्वनिचे नऊ पडसाद पुन्हा पुन्हा त्याच वेळी ऐकू येतात.इमारतीच्या आत भिंतीवर कुराणातील आयते कोरण्यात आले आहेत.असेच आयते आग्र्याच्या ताजमहाल वर देखील आहेत.ही वास्तू कदाचित मलिक अंबरच्या जवळच्या नातलगाची असु शकते.यावर आधिक प्रकाश टाकणे गरजेचे आहे.इमारतीचे घुमट आणि छत्रीच्या क्रेस्टवरील पारंपारिक पर्शियन आणि हिंदु स्थापत्य कलेचा प्रसिद्ध घटक धातुच्या कलशात सुंदर आहे.अर्धकंदुकाकार किंवा पालथ्या कमळाच्या आकाराच्या वास्तुरचनेस ‘कुमुद’ म्हणतात. हिंदीमध्ये या रचनेस ‘गुंबद’ म्हणतात. कुमुद व गुंबद या दोन शब्दांचे मराठी रूपांतर ‘घुमट’ असे झाले. घुमटाच्या रचनेत आवाज सर्व बाजूंनी परिवर्तित होतो आणि एकाच ठिकाणी लहानमोठ्या प्रमाणावर एकामागे एक असे त्याचे प्रतिध्वनी येतात. आवाज घुमण्याच्या या प्रक्रियेस सार्थ अशीच ‘घुमट’ ही संज्ञा आहे.
मुसलमानांनी घुमटाचा वापर मशिदी, दर्गे, मदरसा, धर्मशाळा इ. वास्तूंसाठी केला. इस्लामी वास्तुकलेमध्ये घुमटरचनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोमन व बायझंटिन संस्कृतींशी संबंध आल्यामुळे तुर्की व इराणी वास्तुकारांनी घुमटरचनेचा अंगीकार केला असावा.
वेळात वेळ काढून ही वास्तू पहावी अशी आहे
फोटो: रमेेश खरमळे
 Whᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_||~ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  ~||_*      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম