वजन कमी करण्यासाठी मेंदूवर उपचार

 वजन कमी करण्यासाठी मेंदूवर उपचार


फेसबुक लिंक http://bit.ly/3nYNe5z

वजन कमी करण्यासाठी मेंदूवर उपचार
लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. सध्या भारतमध्ये जवळपास ४ कोटी १० लाख लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसतात.
मेंदूवर उपचार करणारे काही विशेषज्ञ स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती या मेंदूतल्या दोन केंद्रांवर संशोधन करतानाच वजनावरही लक्ष केंद्रित करत आहेत. कारण मेंदूच्या या दोन केंद्रांचा जाडी आणि वजन वाढण्याशी निकटचा संबंध आहे, असे त्यांचे मत झाले आहे. वजन कमी   करण्यासाठी करावयाच्या उपचाराला त्यामुळे एक नवे वळण लागले आहे आणि मानसशास्त्रीय उपचार करून वजन कमी करता येईल असा विश्वास त्यांना वाटायला लागला आहे.वजन कमी करण्याकरिता आहारावर नियंत्रण ठेवणे, आहार नियमित करणे असे उपचार केले जातात परंतु त्यासाठी मेंदूवर उपचार केला जाऊ शकतो हे आता नव्यानेच समोर आले आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,एखादी व्यक्ती नेमकी लठ्ठ का होते याच्या मुळाशी गेलो असता लठ्ठपणाची काही वेगळी कारणे समोर आली आहेत. लठ्ठपणा हा चरबीयुक्त पदार्थ खाण्याने वाढतो आणि माणसाला असे पदार्थ खाण्याची प्रेरणा त्याच्या मेंदूतल्या या दोन विशिष्ट केंद्रातून निर्माण होत असते.
त्यामुळे या केंद्रांवर काम सुरू केले की लठ्ठपणावर उपाय केला जाऊ शकतो. साखर जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि मेंदूतील आकलनाचे केंद्र माणसाला साखर खाण्यास प्रेरित करत असते. त्यामुळे साखर खाण्याचे प्रमाण कमी करण्यापेक्षा साखर खाण्यास प्रेरित करणार्‍या या आकलनाच्या केंद्रावरच उपचार केले की साखर खाण्याची वासनाच होणार नाही.
त्यामुळे मुळावर घाव घालण्याच्या पध्दतीने माणसाच्या मेंदूमध्येच बदल घडवावा म्हणजे आहारावर आपोआप नियंत्रण येईल.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম