भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी

भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी : पाऊस, पिक परिस्थिती, अनेक गोष्‍टींवर भाकितं

११ मे २०२४
बुलढाणा: सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी जाहीर करण्यात आलं.३५० वर्षांची परंपरा असलेली आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास असलेली प्रथा म्हणजे असलेली 'भेंडवळची घट मांडणी'. १० मे रोजी संध्याकाळी ही घटमांडणी पार पडली आणि आज भाकीत जाहीर करण्यात आलं. 
भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?
भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण १८ प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य आणि राजकारणाविषयी वर्षभराचं भाकित केलं जातं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांचंही भेंडवळच्या भाकिताकडे लक्ष लागलं होतं. अखेर या घटमांडणीचं भाकीत जाहीर झालं आहे. 
भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी :
३५० वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या भेंडवळ येथील चंद्रभान महाराज यांनी ही प्रथा सुरु केली ती आजतागायत त्यांच्या वंशजांनी सुरु ठेवली आहे. त्याकाळी म्हणजे ३५० वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज हे गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया अशा एक महिन्याच्या कालावधीत त्यावेळी असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करुन नंतर त्यावर अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वर्षभराचे शेती, पाऊस, राजकीय, पृथ्वीवरील संकटे या विषयी भाकिते वर्तवत असत. परिसरातील शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असत. सध्या देखील ही परंपरा त्यांचे वंशज चालवत आहेत. 
पावसाबाबत अंदाज
पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे. भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. जुलैमध्ये चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल.देशातील राजा कायम असेल.
आज सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवले गेले नाही. 
पहिला महिना कमी पाऊस तर बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.

तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे.

चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे. 

कपाशी पिक सर्वसाधारण असल्याच भाकित भेंडवळची घटमांडणी येथे सांगण्यात आलं आहे. 
        पिक
ज्वारी सर्वसाधारण असल्याचं भाकित सांगण्यात आलंय.

तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मूग आणि उडीद देखील सर्वसाधारण असेल.

यंदा तीळ चांगला असेल. 

एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल

बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगल पिक असेल. 

जवस सर्वसाधारण पिक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण आहे. 

गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल.
राजकीय भाकीत केल्यास थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिला आहे.यामुळे राजकीय भाकीत केली नाही. 
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম