बायोगॅस / गोबरगॅस अनुदान योजना: असा करा अर्ज
ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते. बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते
बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन त्याच्या बांधकामाचे नियोजन करावे लागते.
अनुदानासाठी खालील कागदपत्रे जमा करावित.
१)घराचा उतारा आधार कार्ड लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स ,आधार कार्ड झेरॉक्स
२)पंचायत समितीकडील मंजुरी आदेश
३)बायोगॅस संयंत्र पूर्णत्वाचा दाखला
४)बायोगास बांधकाम करणाऱ्या गवंड्याचे हमीपत्र. बांधकाम सुरू असलेले दोन फोटो (गवंडया सह)
५)प्रतिज्ञापत्र समजुतीचा नकाशा
६)राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम 2021 असे अॅपलिकँट लिहिलेला लाभार्थी गवंडी यांचा फरशीसह फोटो इ.
किती अनुदान मिळेल
सर्वसाधारण गटासाठी – रू. 9,000/- प्रति संयत्र
अनुसूचित जाती व जमाती – रु. 11,000/- प्रति संयत्र
शौचालय जोडणी केल्यास – रु. 1,200/- प्रति संयत्र.
कोठे संपर्क करावा
तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी(कृषि)
किंवा
जिल्हा स्तरावर – कृषी विकास अधिकारी.यांचेकडे
बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा.
अधिक माहितीसाठी पहा…