वाळवंटात वाळुची नदी वाहते: असा व्हॉटसअप व्हिडिओ तुम्ही पाहिला असालच.... तर हे वाचा

 वाळवंटात वाळुची नदी वाहते: असा व्हॉटसअप व्हिडिओ तुम्ही पाहिला असालच.... तर हे वाचा



वाळंटातील देश इराकमध्ये वाळुची नदी वाहते असा व्हिडिओ तुम्हाला व्हॉटसअप वर आलेला असेल. तो पाहुन तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. आणी तो व्हिडिओ तुम्ही पुढे फॉरवर्ड पण केला असेल. 

वाळवंटात वाळुची नदी वाहते: असा व्हॉटसअप व्हिडिओ तुम्ही पाहिला असालच.... तर हे वाचा

हा व्हिडिओ कितपत खरा आहे हे पाहण्यासाठी आम्ही गुगल वर पाहिले असताअसता, आयएफएल सायन्स’ या वेबसाईटवर अशी माहिती मिळाली की ही वाळू नसून ‘हेल स्टोन्स’आहेत.असे समजले. हा व्हिडिओ नोव्हेंबर २०१५ मधील ईराकच्या वाळवंटात टिपलेला आहे. 

"हेल स्टोन" म्हणजे पाण्याच्या ढगांवर वादळाचा उलटा तडाखा बसल्यावर गोठलेले पाण्याचे गोळे पुन्हा ढगात ढकलले जातात. त्यावेळी त्या गोळ्यांवर पुन्हा पाण्याचा थर जमा होऊन गोठतो. त्याचे आकारमान आणि वजन एवढे वाढते की ते गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर झेपावतात. यालाच आपण यांना गारा म्हणतो.

इराकमध्ये २०१५ साली अशी परिस्थिती आली होती की,गोल्फ बॉलच्या आकाराएवढे हे गोळे जमिनीवर पडत होते. यामुळे अगदी आणीबाणी लागू केली गेली.हेच असंख्य गोळे आणि पाणी वाहून चालले असताना वाळूच्या नदीचा भास होत होता.

व्हायरल होत असलेला व्हिडीओच्या व्हिडीओ बनवणाऱ्याने कॅमेरा बराच जवळ नेला आहे. नंतर तर ते गोळे हातात देखील घेतले आहेत. त्यातून सहज लक्षात येते की ही वाळू नसून बर्फासारखे गोळे आहेत.पण आपण ते बारकाईने न पाहता, खात्री न करता पुढे फॉरवर्ड करत असतो. 

तो व्हिडिओ पहा https://youtu.be/xA3VpkH0wCc

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম