इंडोनेशिया : अमानुष परंपरा : घरातील व्यक्तिच्या मुत्युनंतर महिलांना शरीराचा अवयव कापावा लागतो

 इंडोनेशिया : अमानुष परंपरा : घरातील व्यक्तिच्या मुत्युनंतर महिलांना शरीराचा अवयव कापावा लागतो

काही जाती जमाती मध्ये पुर्वापार परंपरा प्रथा पाळल्या जातात. काही परंपरा खुप चांगल्याही असतात तर काही परंपरा अमानवी व विचित्र सुध्दा असतात.यासाठी सरकार, मानवाधिकार संघटना जागरुकता करत असतात.काही जमातीना या प्रथा बंद करणे रूचत नाही. 

इंडोनेशिया : अमानुष परंपरा : घरातील व्यक्तिच्या मुत्युनंतर महिलांना शरीराचा अवयव कापावा लागतो

इंडोनेशिया मध्ये दानी जमाती मध्ये एक अशीच परंपरा आजही पाळली जाते.अडीच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली ही जमात पश्चिम न्यू गिनीच्या उंच आणि घनदाट भागात राहते.ही परंपरा इतकी अमानुष आहे की वाचताना सुध्दा थरकाप उठतो. या दानी जमाती मध्ये "इकिपलिन" नावाची परंपरा आहे. म्हणजे घरातील कोणीही सदस्य मुत्यु पावला की या कुटुंबातील महिलानी आपल्या शरीरातील अवयव म्हणजे हाताची बोटे कापली जातात. परंतु यामध्ये हाताची संपूर्ण बोटं न कापता, बोटांवरचा काही भाग कापावा लागतो.

इंडोनेशिया : अमानुष परंपरा : घरातील व्यक्तिच्या मुत्युनंतर महिलांना शरीराचा अवयव कापावा लागतो

विशेष म्हणजे कुऱ्हाडीने कापला जातो किंवा काही लोकं तोंडाने चावा घेतात आणि दोरीने घट्ट बांधून ते बोट ओढतात, ही एक अमानुष परंपरा आहे.

यांची अशी समजूत आहे की,बोट कापल्याने अस्वस्थ आत्मा मृत व्यक्तीपासून दूर राहतो, तसेच ते शोकातील वेदनांचे प्रतीक देखील आहे. एवढेच नाही तर काही माता स्वत: आपल्या मुलांची बोटे कापतात. यामागे त्यांचे अशी समजूत आहे की, असे केल्याने मुलांचे आयुष्य वाढते.

परंतु बोटे कापण्याच्या या असामान्य प्रथेवर इंडोनेशियन सरकारने काही वर्षांपूर्वी बंदी घातली होती. परंतु ही प्रथा अजूनही गुप्तपणे सुरू आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম