लहान मुले दिवाळीला किल्ला का बांधतात?
दिवाळी म्हणजे समृद्धीच प्रतिक आणि समृद्धीच कारण म्हणजे आजही आपले कर्तव्य बजावणारे आणि दिमाखात उभे असलेले गडकिल्ले.
महाराष्ट्रातील किल्ले,गड या सा-यांना फार प्राचीन काळापासून मानाचे महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा ,आत्मसात करावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण लहानपणापासून व्हावे यासाठी महाराष्ट्रात दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकविण्याची प्रथा सुरु झाली.शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या स्वराज्यात स्वातंत्र्य होते. लोकांना सुरक्षितता होती. जुलमी राजवटीकडून होणारे शोषण थांबले होते. लोकं खरोखर सुराज्य, रयतेच राज्य स्वप्नाच्या जगातून प्रत्यक्षात उतरलेलं बघत होते.
… या किल्ल्यांमधे आसनावर आरूढ़ झालेले शिवाजी महाराज , किल्ल्यावर रक्षण करणारे त्यांचे मावळे , तोफा, झाडे -झुडपे अशी आकर्षक मांडणी .... त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करण्याची कल्पना साकारून हिंदवी स्वराज्याची कल्पना बाल पिढीमाधे रुजविण्याचे कार्य ख-या अर्थाने चालू झाले .... किल्ले बनवण्याची परंपरा जरी पूर्वी पासून तशीच चालत अली असली तरीही आज किल्ले बनविण्याच्या पद्धतींमधे पुष्कळ बदल झाले आहेत. बदलत्या काळासोबतच पारंपारिक पद्धतींना आधुनिकतेची जोड़ लागली आहे.... म्हणजेच पूर्वी ज्याप्रमाणे इतिहासाच्या पुस्तकामधील चित्रानुसार बनवले जाणारे किल्ले आता कंप्यूटर आणि मोबाइल मधे ऑनलाइन चित्रे पाहून बनविली जातात…
लहान मुलांमधे किल्ले बनविण्याचे मुख्य कारण म्हणजे किल्ल्यांबद्दलची त्यांची कुतूहलता आणि आकर्षण .... दिवाली निमित्त नविन कपडे , फटके, फराळ या सर्वांमधे दंग असणारी मुलं किल्ले-बांधणीच्या स्पर्धांमुळे स्वतः किल्ले बनविण्यात दंग आहेत अशी चित्र जागो-जागी बघायला मिळाली .... लहान मुलांना किल्ले बनविण्याच्या आपल्या संस्कृतीचा इतिहास जपण्यासाठी पालकांनी ,कुटुंबीयांनी पुढाकार घेवून मुलांना उत्तेजन द्यायला हवे.... सार्वजनिक मंडळ, सेवाभावी संस्था ,राजकीय पक्ष तर अश्या प्रकारचे किल्ले बांधणी उपक्रम प्रत्तेक वर्षी राबवत असतात … आपल्या मुलांना आवर्जून अश्या प्रकारच्या स्पर्धांमधे भाग घ्यायला लावणे एवढे कर्तव्य तरी पालकांनी करायला हवे… लहान मुलांना अश्या प्रकारचे प्रोत्साहन पुढे घेऊन जाते .... शिवाय आता किल्ले बनविण्यासाठी बाजारात अनेक साहित्य उपलब्ध झाले आहेत. मुले दिवाळी सुट्टी किल्ले बांधण्यात सत्कारणी लावत असतात.
▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁
हल्ली दिवाळी आली की अर्बनक्लॅपची माणसं येतात दोन तासात घर स्वच्छ करून जातात पण महिनाभर सकाळी अंगण धुवून गल्लीत भरणारी अघोषित रांगोळी स्पर्धा मात्र गेली..
आता ठरलेला इलेक्ट्रिशियन येतो माळ्यावरचं खोकं काढून पंधरा मिनिटात झगमग लायटिंग लावून जातो..
पण पणत्या मांडणारी मुलं, त्यात तेल घालणाऱ्या मुली, रांगेत पणत्या पेटवणारी त्यांची आई मात्र गेली..
आता मोठी माणसं बाजारात जातात..आकाशात आतीषबाजी करणारे दोन चार फटाके आणतात पण ठेवणीतली बंदूक आणि सकाळी उठून न फुटलेले लवंगी फटाके गोळा करणारी ‘टोळी’ मात्र गेली..
सणाचे कपडे घ्यायला आधी सगळं कुटूंब निघायचं..तीनशे रुपयाची रफ ॲंड टफ जिन्स आणि दोनशेचा कुमारचा शर्ट घेतला तरी घरच्यांना खूपच चुना लावला असं वाटायचं..
हल्ली ऑनलाईन मागवलेल्या मोज्यांनाही त्यापेक्षा जास्त पैसे लागत असले तरी शाॅपिंगची ती ‘गम्मत’ मात्र गेली..
पूर्वी घरटी खाद्यपदार्थांचा खमंग वास यायचा. एरवी वर्षभर एकमेकांशी न बोलणारा शेजारही एकमेकांकडे फराळाला जायचा..
आताशा भांडणं तर दूर पण आंतरीक ओलावाच संपल्यानं ‘जवळीक’ मात्र गेली..
माणसं श्रीमंत झाली पण दिवाळी मात्र गरीब झाली..
🪔🪔🎊🎊🪔🪔
Tags
दिवाळी