वारूळातील टेकराज
आौषधी म्हणुन हा खाल्ला जातो
वारूळ म्हटले की हटकुन सापाचा विषय निघतो. पण प्रत्येक वारूळ हे सापाचे असतेच असे नाही.वारूळ हे वेगवेगळ्या प्रकारची असतात.जमिनीखाली बिळे व भोके पाडून त्यांची एक गुंतागुंतीची मालिका तयार करून वारूळ बनलेले असते.
|
टेकराजा Termite Queen |
मुंग्याचे व वाळवीचे वारूळ आोळखता येते वेगळ्या प्रकारचे वाळवीचे वारूळ असते या वारूळाच्या तळाचा व्यास ३-५ मी. असतो. तो खूप बळकट व टिकाऊ असतो. तो तयार करण्यासाठी मातीचे कण, चिखल, लाळ व विष्ठा यांचा वापर केला जातो. |
एवढे मोठे वारूळ असु शकते |
तो चिखल वाळल्यावर तो सिमेंटच्या कामासारखा कठीण व भक्कम होतो. जमिनीवर वारुळाच्या मातीचा ढिगारा नेहमी आढळतोच असे नाही. |
वारूळ उकरताना |
|
याच्या आत टेकराज असतो |
प्रसिद्ध लेखक व वनतज्ञ मारूती चित्तमपल्ली यांचे आत्मचरित्र "चकवाचांदणं- एक वनोपनिषद" हे पुस्तक आहे त्यात एक उल्लेख येतो की, वारुळात खुप खोलवर "टेकराज" नावाची एक अळी असते.ती खाल्यास माणसाला जबरदस्त कामशक्ती येते.हा समज आदिवासी,खेडुत यांच्या मध्ये आहे.मोठ मोठे वारुळ खड्डा खोदुन हा "टेकराजा" बाहेर काढला जातो. |
मातीचा कप्पा उघडल्यानंतर आत असलेला टेकराज |
हा राजा म्हणजे दिसावयास लिबलिबित पांढरया रंगाची ही अळी असते.शास्त्रीय भाषेत हिला Termite Queen असे म्हणतात.तर ग्रामीण भागात याली टेकराज किंवा वारूळाचा राजा म्हणतात.काही भागात याला "उधई" म्हणतात.हा सहजासहजी सापडत नाही.याचे घर वारूळात खुप खोलवर असते.या किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या वारूळात अक्षरश: लाखो वाळव्या एकत्र नांदत असतात. वारूळात राणीची "खास" खोली असते आणि तिथे तीची योग्य ती बडदास्त ठेवली जाते. इतर भागात पिल्लांसाठी खोल्या, त्यांच्या अन्नासाठी बुरशी वाढवायच्या खोल्या इतकेच नव्हे तर वारूळ आतून थंड रहावे म्हणून वातानुकूलीत खोल्यासुद्धा खास रचना करून बांधलेल्या असतात.चारीबाजुनी मातीच्या आत मध्यभागी मऊ मातीचे अर्धवर्तुळाकार एकावर एक पापुद्रे असतात त्याच्या मध्ये मऊ मातीच्या कुशीत बोटभर लांबीची अळी असते.तोच हा "टेकराज". हा टेकराज आदिवासी लोक एका दमात गिळतात.हा गिळल्यानंतर खुप लांबवर जाऊन घाम येईपर्यंत पळुन यावे लागते.त्याशिवाय हा पचत नाही.हा टेकराज खाल्याने कंबरेचे दुखणे, मुतखडा, वातरोग,मधुमेह,व चांगल्या दृष्टीकरिता उपयोगी असतो असा समज आहे.आंतराष्ट्रिय बाजारात याला खुप मागणी असुन किंमतही लाखामध्ये असते असे समजते. खेडयातुन अनेक समज आहेत जंगली जडीबुटी, प्राणी यांचा वापर होतो तसाच हा प्रकार आहे.
शास्त्रीय भाषेत या टेकराजला Termite Queen म्हणतात.वास्तविक ही राणीअळी असते.ती दररोज लाखोने अंडी घालते.राणीची सरासरी लांबी ४ते ६ इंच किंवा कामगारी अळीपेक्षा आकाराने थोडी मोठी असू शकते.राणीच्या मोठ्या आकारामुळे ती मुक्तपणे फिरू शकत नाही आणि कामगार अळीच्या मदतीवर पूर्णपणे अवलंबून असते.तसे पाहता हा टेकराज आरोग्यासाठी उपयोगी आहे या समजाला शास्त्रीय दृष्ट्या पाहता याला काही आधार नाही.
|
टेकराज ≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡ |