गुजरात : "डुमास बीच" या ठिकाणी जाण्यास लोक कचरतात
भारतातल्या सर्वात जास्त रहस्यमय जागांपैकी "डुमास बीच"या समुद्र किनाऱ्याचे नाव येते.गुजरात राज्याच्या सुरत शहरापासून २०-२२ किलोमीटरवर "डुमास बीच" आहे. समुद्रकिनाऱा म्हटला की पांढरी किंवा पिवळी वाळू असते. आसपासच्या भागात लोकवस्ती जास्त नाही, पण हा किनारा काळ्या रंगाच्या वाळूने व्यापला आहे.त्यामुळे या किनाऱ्याला थोडे वेगळेपण येते.
या किनाऱ्यावर पूर्वी आजूबाजूच्या भागात माणसे मेली कि अंत्यसंस्कार उरकत असत... आताही तेथे स्मशान आहे. किनाऱ्यावर एक भाग असा आहे येथे स्मशानभुमीसुद्धा आहे.असं म्हणतात की इथे मृत्यू झालेल्या अशा व्यक्तींची आत्मा भटकतो ज्याचाी काहीतरी सुप्त इच्छा अपूर्ण राहिलेली आहे. आणि त्याच इच्छेसंदर्भात काहीतरी मदत मागताना इथे कुणाचातरी आवाज येतो किंवा भास होतो .
असं म्हणतात की येथे रात्रीच्या वेळी जो कुणी इथे गेला तो पुन्हा कधीच परत आला नाही. आणि याच भीतीमुळे जसजशी संध्याकाळ होत जाते तशी लोकांची इथे गर्दी कमी व्हायला लागते. एरवी या बीचला प्रेमी युगुलांचा बीच असंही म्हटलं जातं कारण दिवसभर इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत जोडप्यांची संख्या जास्त आहे. हेही तितकंच खरं की या भुताटकीच्या गोष्टी जेव्हापासून जास्त प्रसिद्ध होऊ लागल्या तेव्हापासून इथे पर्यटकांची संख्या वाढली आहे.विशेष म्हणजे इथे दिवसा कुत्री दिसत नाही.पण रात्रीच्या वेळी मात्र खूप जास्त कुत्रे इथे येतात आणि जोरजोरात भुंकायला लागतात. असे म्हणतात की,कुत्र्यांना भुतांचा वास येऊ लागतो , भुतांची जाणीव व्हायला लागते आणि त्यामुळेच कुत्रे भुंकत असतात. या गोष्टीमुळे देखील रात्रीच्या वेळी लोक तिथे न जाणेच पसंत करतात.असंही म्हणतात की, रात्रीच्या वेळेस येथे एक विक्रेता किनाऱ्यावर भटकत असतो व त्याच्याकडील वस्तू घेण्याचा आग्रह करतो. यामुळे व पसरलेल्या अशा कथामुळे हा बीच लोकप्रिय झाला आहे. त्यात सोशल मिडियावर तर खरंखोटं खुप प्रमाणात येत असल्याने काही लोकांना हा बीच भीतीदायक वाटतो तर काहीना आकर्षक वाटतो.