रहस्यमय व आश्चर्यकारक प्राणी

जगात अनेक प्राणी आहेत. पण "प्लॅटिपस" नावाचा हा प्राणी पाहिला तर हा प्राणी वाटणार नाही असा आहे.प्राणी म्हणाल तर मग ह्याला चोच कशी आणि जर पक्षी असेल तर ४ पाय कसे? तरीही हा सस्तन प्राण्यांमध्ये मोडतो.टास्मानिया व ऑस्ट्रेलिया मधील पाणथळ जागी हा प्राणी सापडतो.

रहस्यमय व आश्चर्यकारक प्राणी
"प्लॅटिपस" 
खेळण्यातील चित्रविचित्र प्राण्यासारखी याची शरीररचना असते. याला पॅडलच्या आकाराची शेपटी असते,ओटर सारखा गोंडस, रसाळ शरीर आणि सपाट बदकासारखे जाळेदार पाय असतात.हा पुढच्या पायांने पोहतो, पोहतानाच बदकासारख्या दिसणारया चोचीने अनेक कीटक आणि संधिपाद जीवांचा फडशा पाडतो. कवचधारी व मृदुकाय प्राणी, कृमी, कीटक हे त्याचे अन्न होय.याच्या चोचीसारख्या अवयवात "इलेक्ट्रोसेन्सर्स"असतात.त्यामुळे डोळे बंद ठेवूनदेखील ते पाण्याच्या तळाशी भक्ष्य शोधू शकतात.त्यांच्याकडे जलरोधक फर,त्यांचे कान आणि डोळे झाकणारी त्वचा आणि नाक असते. जे पाण्याखाली असताना त्यांचे संरक्षण करण्यासाठी बंद करता येतात.ह्याचे शरीर हे पाणमांजराशी मिळते जुळते असते.याचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्राणी उन्हात सूर्यप्रकाश शोषून ठेवतो आणि काळोखात ती ऊर्जा वापरून चमकू लागतो. याला 'बायोफ्लुरोसेन्स' असे म्हणतात. ही एक प्रकारची जीवदीप्तीच आहे.एकमेकांबरोबर संवादासाठी हे 'बायोफ्लुरोसेन्स' वापरले जाते.प्लॅटिपस नरांमध्ये एक प्रकारचे विष असते.त्यांच्या मागच्या पायाला अणकुचीदार नांग्या असतात ज्याद्वारे ते विष सोडू शकतात आणि ह्याचा वापर तो बचावासाठी करतो दुसरे विशेष असे की, मिलनानंतर याची मादी २५-३० फूट लांब बीळ खणते, बिळाचे एक तोंड पाण्याखाली असते व दुसरे काठावर असते.बिळाला गवताचे अस्तर असते व त्यात घरट्याची कोठी असते त्या घरटयात  दोन ते तीन अंडी घालते  ती अंडी चिकट पदार्थाने चिकटलेली असतात.मादी आपल्या शेपटाने त्यांना घट्ट आवळून उब देते.१० ते १४ दिवस अंडी उबवते आणि यातून वाटाण्याच्या आकाराची पिल्ले बाहेर येतात.जन्माच्या वेळी पिलांच्या अंगावर केस असतात.मादीला स्तनाग्रे नसतात, मात्र तिच्या उदरभागातून दूध झिरपते, ही 'पग्लस' ते दूध चाटून मोठी होतात.प्लॅटिपस प्राण्याला पोट नसते. त्या ऐवजी ह्याचा अन्नमार्ग हा सरळ आतड्यांशी जोडलेला असतो.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম