वानरांचे सामुहिक आत्मसमर्पण व भुक लाडु तहान लाडु

 

वानरांचे सामुहिक आत्मसमर्पण
 व भुक लाडु तहान लाडु

प्रसिद्ध लेखक पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारूती चित्तमपल्ली यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक 'चकवाचांदणं' या पुस्तकात वानरांची एक अदभूत सत्य कथा सांगितली आहे. 

वानरांचे सामुहिक आत्मसमर्पण   व भुक लाडु तहान लाडु

ते म्हणतात की, माणुस हा योगी नाही तो नंतर शिकुन योगी होतो. तर वानर हे जन्मजात योगी आहेत.ज्यावर्षी दुष्काळ पडणार असतो त्यावेळी निसर्ग संकेत देत असतो.हे संकेत जंगलातील प्राणी आोळखत असतात.वानराला हे  येणारे संकट समजल्यावर वानर आपल्या पिल्लासाठी भुकलाडु- तहानलाडु बांधून ठेवतात.यासाठी ते विविध झाडाची पाने, फुले व मध एकत्र करून चावुन खाली टाकतात. नंतर त्याचे गोळे करून ते झाडाच्या ढोलीत ठेवतात.त्यातील मधामुळे पाने फुले कुजत नाहीत.

सामुहिक आत्मसमर्पण

येणारा दुष्काळ आपल्या पिल्लाना सुसहय व्हावा.अन्नासाठी त्यांना फिरावे लागु नये म्हणून हे लाडु केलेले असतात.पिल्लांच्या जगण्याची व्यवस्था झाली की, हे सर्व प्रौढ वानर एकत्र येतात व आपण जगण्यात काही अर्थ नाही म्हणुन, गोल बसतात व एकमेकाच्या खांद्यावर हात ठेऊन अक्षरश: एका मिनिटात जीव सोडतात.श्री चित्तमपल्ली यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे.ही घटना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलिही आहे.खरोखर आश्चर्यकारक ही घटना आहे.हे सामुहिक आत्मसमर्पण म्हणता येईल. 

जीवनसाखळी सुरळीत राहण्यासाठी निसर्गाची ही योजना तर नसेल?


वानरांचे सामुहिक आत्मसमर्पण   व भुक लाडु तहान लाडु

संदर्भ: 'चकवाचांदणं' पान नं ५७५ 




थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম