मनःशांती कशी मिळेल?

मनःशांती कशी मिळेल?

मनशांती खूप जणांना हा गहन विषय वाटतो पण खूप सोपे आहे मनशांती मिळवणे.

🔹रोज कमीत कमी ५ सूर्यनमस्कार घालावेत. मनशांती आणि आत्मबळही वाढते.

मनःशांती कशी मिळेल?
🔹थोडीशी योगासने (फक्त शवासन नको), थोडेसे प्राणायाम.

🔹दिवसातून थोडासा स्वतःसाठी वेळ - या वेळेत आपल्या दिवसभराचा आढावा घ्यायचा. जर काही चुकीचे काम केले असले तर त्याची क्षमा मागण्याची तयारी दाखवायची (समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा छोटी वाटली तरीही) आणि ती क्षमा मागायचीही. थोडेसे कठीण जाते क्षमा मागणे सुरवातीला जर सवयच नसली तर पण एकदा क्षमा मागितली ना कि मन खूप हलके होते (तुम्हाला मुन्नाभाई सिनेमा आठवतो का? त्यात नाही का तो सर्किटची क्षमा मागतो तसेच काही... ). अगदीच तरीही जमले नाही तर परमेश्वराजवळ मनापासून माफी मागावी तो तुम्हाला माफी मागण्याचे निश्चित बळ देईल. माफी मागणे हा मनाचा कमकुवतपणा नसून मोठेपणा आहे. करून बघा!

🔹घरातील वृद्धाना दिवसातील फक्त १० मिनिटे द्यावीत. मोकळा वेळ - त्यांना विचारावे कसे आहात, तब्येत बरी आहे ना! वगैरे वगैरे......

ते आधी तुमच्या कपाळाला हात लावून बघतील, काही वेडेवाकडे खाऊन पिउन आलास का विचारतील पण तुम्ही मनापासून विचारात आहात हे लक्षात आले कि त्यांच्या डोळ्यात जे अश्रू येतील ते अलगद आपल्या हाताने पुसावेत. खूप ताकत आहे त्या अश्रूत, तुम्हाला तुमचा वेळ फुकट गेला असे कधीच वाटणार नाही.

🔹असाच थोडासा वेळ घरातील बाहेरच्या निर्बल लोकांना द्यावा. कोणीही असू शकेल ते, थोडीशी त्यांच्या कामात मदत, एकाद्या आजीला रस्ता क्रॉस करायला मदतीचा हात द्या. शेजारच्या काकींच्या हातातील जड पिशव्या (न पाडता) आणि त्यांच्याच घरी घेऊन जा! आपल्या कॉलनीत काही चुकीचे प्रकार होत आहेत असे वाटल्यास ते थांबवण्याचा प्रयत्न करा.

कोरा लिंक :  http://bit.ly/33jgsGr Anil Patil यांनी दिलेले उत्तर

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম