'इरिटेबल बॉवेल सिंड्रोम' (आयबीएस ) वरील उपचार काय आहेत?
पोटाच्या आजारांपैकी नेहमी आढळणारा आजार म्हणजे ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ (आयबीएस ). अनेक व्यक्तींना या आजाराचा त्रास जाणवतो. पोटात दुखते, कधी जुलाब होतात तर कधी मलावरोध. पोट फुगते, ढेकर येतात, पोटात गडगडणे आणि शौचाला साफ न झाल्याची भावना होते.
या विकारावरचे उपाय आहारात विरघळणाऱ्या तंतूंचे प्रमाण वाढवणे.भाताची पेज, अधिक पिकलेली केळी, बिया काढून राहिलेला पेरूचा गर, उकडलेले सफरचंद, डिंक यात असा विरघळणारा तंतू मोठ्या प्रमाणात असतो तंतूमध्ये पाण्याचे रेणू राहतात. त्यामुळे, मलावरोध होत नाही. उलटपक्षी जुलाब होताना होणारी आतड्यांची जलद हालचाल या विरघळणाऱ्या तंतूमुळे संथावते. हे रेणू मोठ्या आतड्याच्या अस्तराला ऊर्जा पुरवतात. त्यामुळे आतड्याचे काम सुधारते. औषधांमध्ये पोटात कळ येऊ नये, अशी औषधे वापरली जातात. ज्या रुग्णांना जुलाब होतात त्यांना जुलाब थांबविण्याची औषधे दिली जातात. परंतु, या उपचारांचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो.बहुतेक व्यक्तींना मिरचीचे तिखट, लवंग, कच्चा कांदा, लसूण, पालेभाज्या, शिरांच्या भाज्या, कॉफी, साखर, वाटाणा, पावटा, हरभरा, डाळी, उसळी, कोबी अशा पदार्थांच्या सेवनाने कमी-जास्त त्रास होतो. आपल्याला जो पदार्थ पचत नाही, तो टाळणेच इष्ट असते, हा उपचारातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो.
हा विकार बरा होण्यास आहारातही बदल हवेत. अन्यथा अकारण तपासण्या व नवेनवे उपचार करणे या चक्रात रुग्ण अडकतो. त्रास पूर्ण बरा झाला नाही तरी आयबीएसमुळे अपाय होत नाही. मात्र, जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे आहेत. आवश्यक तेव्हा जरूर औषध घ्यावे.
कोरा लिंक : http://bit.ly/3p879kr Anil Patil यांनी दिलेले उत्तर
Tags
आरोग्य