पित्त झाल्यावर डोके का दुखते?
आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ असे त्रिदोष आहेत. जे प्राकृत अवस्थेत उपयोगी व शरीराचे धारण करणारे आहेत तर विकृत झाले की हेच शरीरातील इतर घटकांना बिघडवून आजार निर्माण करतात. पैकी पित्त हे अन्नपचन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक त्यामुळे त्याचे प्राकृत असणे फारच महत्त्वाचे. हे ज्याप्रमाणे पित्ताशयातून येत असते त्याचप्रमाणे घेतलेल्या आहारातूनही तयार होत असते. त्यामुळे पित्ताशय जरी काढून टाकला तरी त्याचे काम आपल्या आमशयामध्ये चालू असते. ज्याप्रमाणे आपण तुपाचा दिवा लावल्यानंतर तूप जळून त्यातून अग्नी तयार होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरातसुद्धा घेतलेला आहार जळतो आणि त्यातून अग्नी म्हणजेच जठराग्नी तयार होतो.
म्हणून तर आपण जेवणामध्ये तिखट, तेलकट पदार्थ खाल्ले की आपली भूक उलट वाढते, अजून अन्न खावेसे वाटते व पर्यायाने पित्तही वाढते. मात्र आपण गोड पदार्थ खाल्ले की आपली लगेच भूक शमते व आपले पित्तही कमी होते. पण आपण जास्त व अधिक मात्रेत गोड पदार्थ खाल्ले की भूकच मंदावते व अग्निमांद्य होते. म्हणजे आपण जे खातो त्याचे अगोदर पित्तात व पर्यायाने अग्नीत रूपांतर होतेया पित्ताचा प्रत्येकाला होणारा त्रास वेगवेगळा असतो. जसे की- काहींना घशात, छातीत जळजळ-मळमळ होते, काहींना जेवणानंतर करपट ढेकरा येतात, पोटात जळजळ होते, तर काहींना अपचन, मूळव्याध मागे लागते. काहींचे पित्त वाढले की डोके दुखू लागते. काहींना त्वचाविकार मागे लागतात तर काहींच्या अंगाला फक्त खाज सुटते. अंग नेहमी गरम वाटते, डोळ्यातून आग आग होते तर काहींना केस गळणे-पिकणे, मासिकपाळीच्या तक्रारी, चेहऱ्यावर तरुण्यापीटिका किंवा अंगावर बारीक बारीक फोड येऊ लागतात. हे सर्व वेगवेगळी लक्षणे दिसत असली तरी हे होण्यामागचे कारण मात्र वाढलेले पित्तच असते.
कोरा लिंक : http://bit.ly/3JtHLgn Anil Patil यांनी दिलेले उत्तर