शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या लिखाणाला लोंकाचा विरोध का?
पुरंदरे गेली साठ वर्षे सह्याद्रीच्या रांगांमधून भटकले आहेत. त्यांनी अनेक मोठ्या संशोधकांचे लेखन जागरुकपणे वाचले आहे. त्यांना इतिहासाची बैठक असून ते शाहिरी पद्धतीने लेखन करतात. त्यांनी सगळे आयुष्य संशोधनासाठी वेचले.बाबासाहेब पुरंदरेंना शिवशाहीर ही पदवी साताऱ्याच्या राजमाता स्व. सुमित्राराजे भोसले मातोश्रींनी दिली होती.
पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला जाग येण्याआधी या वा तत्समांची राजकीय कुंडली जागृत झाली आणि आपल्या अल्पस्वल्प बुद्धीस पटतील अशी कारणे देत त्यांनी बाबासाहेबांना.विरोध सु रू केला. याचा अर्थ असा की ज्या महाराष्ट्रात एके काळी तटस्थ बुद्धिवंत हे येथील राजकीय नेतृत्वास मार्ग दाखवीत त्या महाराष्ट्रात आज बाल्यावस्थेतील राजकीय नेत्याची री ओढण्यात या विद्वानांना कोणतीही काही वाटत नाही.
सामान्य लोंकाचा पुरंदरेना विरोध नव्हता व नाही. पण राजकारणी लोकामुळे, पुरंदरे हे लोकानी स्विकारले नाहीत असा भास मात्र करणेत येत आहे. बाबासाहेबांनी जे लिखाण केले आहे त्यातील चुका दुरुस्त करून त्यांचा जाहीर धिक्कार करणाऱ्या लोकांनीच एक शिवचरित्र लिहावे हा सर्वात उत्तम उपाय आहे.व्हाट्सएपच्या msg वर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं शिवचरित्र नीट डोकं शांत ठेवून वाचलं आहे का? हे तपासून घ्या आणि मग स्वतः ठरवा.
कोरा लिंक : http://bit.ly/3oqCNZb Anil Patil यांनी दिलेले उत्तर