"इमोजी"चा शोध कोणी आणि केव्हा लावला? त्याचा वापर कोठे व कधी केला जातो?
ऑनलाइन संवादादरम्यान एखादी वस्तू, स्थळ, हवामानाची स्थिती,चेहऱ्यावरील हावभाव आदी मांडणारे चित्र म्हणजे इमोजी. शब्दां ऐवजी चेहऱ्यावरील भावना प्रदर्शित करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा भावना दाखवण्याचा हा प्रभावी आणि लोकप्रिय मार्ग समजला जातो.
🔹कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षक स्कॉट फॅलमॅन यांनी इमोटीकॉनचा वापर केला होता. याचा इमोजीचा खूप वापर होतो. याविषयी स्कॉट म्हणाले होते की, मी जे बनवले ते नुकसानकारक नव्हते. मात्र याचा वापर खूपच वाढला आहे. त्याला मी कधीच परवानगी दिली नव्हती.(वरील दोघानी इमोजी शोधाबददल दावे केले जातात.)
पहिला इमोजी
आपल्या भाव-भावनांचा व्हर्च्युअल आविष्कार म्हणजे इमोजी. ते फार जुने नक्कीच नाहीत. जपानमधील मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी 1999 मध्ये शब्दांतून संभाषण करताना काही चित्ररूप मेसेज पाठवण्यास सुरवात केली.यातूनच चित्ररूप संभाषणाची पद्धत रूढ झाली. चित्ररूप संभाषणाची प्रमाण वाढताच जपानमधील एका मोबाईल कंपनीतील अभियंत्यांनी त्यावर संशोधन सुरू केले.डोकोमो या कंपनीने सर्वप्रथम "आय मोड‘ नावाची सुविधा देऊन युजर्स ना त्यांच्या भावना चित्रात व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
व्हॉट्स ऍपवर इमोजींची खैरात
व्हॉट्स ऍपने आपल्या नव्या आवृत्तीमध्ये धमाल इमोजी सादर केल्या आहेत.
यामध्ये फिरणारे डोळे, काल्पनिक घोडा, पॉपकॉर्न बॉक्स आदींचा समावेश.
इमोजींच्या प्रकारानुसार विभागणी - फूड, स्पोर्टस, ऍक्टिव्हिटीज आदी नवे विभाग.
इमोजीनची विकीपीडिया समजल्या जाणाऱ्या इमोजीपीडियाचे संस्थापक Jeremy Burge इमोजी दिन २०१४ पासून साजरा करण्यास सुरूवात केली.
17 जुलै आणि हा दिवस जागतिक इमोजी दिन म्हणून साजरा केला जातो.
कोरा लिंक : http://bit.ly/3HWxycf Anil Patil यांनी दिलेले उत्तर