तुम्हीसुध्दा चंद्रावर जमीन खरेदी करू शकता

तुम्हीसुध्दा चंद्रावर जमीन खरेदी करू शकता

ग्रह-तारे हे सर्वांनाच खुणावत असतात.प्रियकर सुध्दा प्रियेसीला तुला चंद्र आणुन देण्याचे आश्वासन देत असतो. अर्थात ही कवी कल्पना आहे. पण वास्तव विचार केला तर तुम्ही सुध्दा चंद्रावर जमीन  खरेदी करू शकता. ती ही स्वस्तात. 

तुम्हीसुध्दा चंद्रावर जमीन खरेदी करू शकता

अनेकानी चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा  कधीतरी विचार केला असेल. यापूर्वी चंद्रावर जमीन खरेदी करून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रिय व्यक्तीना भेट दिल्याच्या बातम्या कधीतरी वाचली किंवा एेकली असेल, हे ऐकून, लोक चंद्रावर जमीन कशी खरेदी करतात?, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असणार. 

आपण बातम्यामध्ये किंवा इंटरनेटवर देखील पाहिले असेल की अनेक लोक चंद्रावर जमीन खरेदी केली असलयाचा दावा करतात.त्यांच्या वतीने हा दावा खरा आहे, कारण इंटरनेटवर अशा बर्‍याच वेबसाईट्स आहेत, ज्या चंद्रावर तुम्हाला जमीन खरेदी करून देतात.या वेबसाईट आपल्याला चंद्रावर जमीन खरेदी करण्याची ऑफर देतात आणि आपण त्याची रक्कम देता तेव्हा आपल्याला कागदपत्र देखील मिळतात.लोक हौसेसाठी काहीही करतात. म्हणूनच हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं.चंद्रावर जमीन खरेदी करणे हे पृथ्वीपेक्षा स्वस्त आहे. या वेबसाईटवर एकरानुसार चंद्रावरची जमीन विकली जाते. ही किंमत डॉलर स्वरूपात आहे. प्रति एकर सुमारे ३५ ते ४५ डॉलर या भावाने तिची विक्री चालू असुन खरेदी केल्यानंतर लगेच जमिनीची कागदपत्रे मिळतात.जमीन खरेदी केल्यावर ती जमीन तुम्हाला कोठे आहे ते स्थळ पृथ्वीच्या नकाशावर दाखवले जाते. यामध्ये त्याचे स्थान, रेखांश याची माहिती असते. तसेच त्या भागाच्या नावाची माहितीही दिली जाते. त्यात उपग्रहाद्वारे घेतलेले फोटोदेखील  दिले जातात. आपल्याला चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा संपूर्ण अनुभव येथे दिला जातो.वेबसाईट्सवर ही खरेदी ऑनलाईन पैसे देऊन  केली जाते. 

तसे पाहिले तर अवकाशांतील ज्या वस्तू आहेत त्यावर  कोणाचाही अधिकार नाही. कि मालकी नाही. अशा परिस्थितीत तेथे कोणीही काही विकु शकत नाही किंवा खरेदी करू शकत नाही.तसे ते बेकायदेशीर आहे.
१९६७ मध्ये जगातील १०४ देशांनी संयुक्तपणे बाह्य अवकाश करारावर स्वाक्षरी केली आहे, यामध्ये भारताचा देखील सामावेश आहे त्या करारानुसार कोणत्याही एका देशाची मालकी चंद्रावर नाही. 

मग हे खरेदी प्रकरण आहे तरी काय? 

वास्तविक पाहता चंद्रावर जमीन खरेदी करणे व त्याची कागदपत्रे दाखवत मिरवणे म्हणजे फक्त नि फक्त मानसिक समाधान आहे. तेथे तुम्ही जाऊ शकत नाही राहण्याचा तर प्रश्नच नाही. यातुन फक्त तुम्हाला मानसिक आनंद व समाधान मिळते. 

तुम्हाला जर चंद्रावर जमीन खरेदी करून मानसिक आनंद व समाधान मिळवायचे असेल तर  http://bit.ly/3yZQzHo  या लिंकवर जाऊन जमीन खरेदी करू शकता. 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম