शिवसेनेचे जनक - आचार्य अत्रे
आपणा सर्वांना माहीत आहे की, शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ रोजी केली.आणि 'शिवसेना' हे नाव प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवले असे आपण जाणतो.
पण मुळची शिवसेना ही संकल्पना आचार्य अत्रे यांनी मांडली होती हे आपणास कितपत ठाऊक आहे.
ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दिवस होते.गुजरात राज्य स्थापन झाले होते व तेथील गुजराती मंडळीचा मुंबई वर डोळा होता.मुंबईवरचा आपला हक्क सोडण्यास मराठी माणूस तयार होत नव्हता.केंद्रात नेहरू सरकार होते.द्वैभाषिक राज्याचे माजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे केंद्रात वजन होते.त्यामुळे एखादा वटहुकूम काढुन वा कायद्याच्या चौकटीतून पळवाट काढून मुंबई गुजरातला दिली तर काय करायचे?? हा प्रश्न मराठी माणसाला अस्वस्थ करून सोडत होता.कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.म्हणुन मराठी माणसांसाठी,महाराष्ट्रासाठी, एक बिगर राजकीय संघटना असावी असे आचार्य अत्रे यांना वाटत होते.फक्त मराठी माणसांच्या भल्यासाठी काम करणारी संघटना असावी. जेणेकरून ती दबावगट म्हणून काम करेल.
यावरून असे म्हणता येते की, शिवसेनेचे जनक हे आचार्य प्र.के. अत्रे हेच होते. शिवसेना हे नाव प्रथमत: आचार्य अत्रे यांनीच वापरलं होतं व ते अशी संघटना निर्माण करण्याच्या प्रयत्नात देखील होते हे दिसुन येते.
नंतर म्हणजे अत्रे यांनी लेख लिहिल्यानंतर सुमारे सात वर्षानंतर १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आत्ताची जी शिवसेना आहे तिची स्थापना केली.